कोल्हापूर : बांबवडे येथील गर्भपात प्रकरणी कारवाई करण्याची मनसेची मागणी

बांबवडे: पुढारी वृत्तसेवा: बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील आनंद हॉस्पीटलमध्ये जिल्हा भरारी पथकाने धाड टाकून स्त्रीभ्रूण हत्या, व अवैध गर्भपात रॅकेट उघड केले होते. दरम्यान, या प्रकरणाचा योग्य तपास करावा, दोषींवर कडक कारवाई व्हावी, अन्यथा जनहित याचिका दाखल केली जाईल, असा इशारा मनसेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब कदम यांनी निवेदनाव्दारे दिला आहे. या प्रकरणाचा तपास योग्यरित्या होत …

कोल्हापूर : बांबवडे येथील गर्भपात प्रकरणी कारवाई करण्याची मनसेची मागणी

बांबवडे: Bharat Live News Media वृत्तसेवा: बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील आनंद हॉस्पीटलमध्ये जिल्हा भरारी पथकाने धाड टाकून स्त्रीभ्रूण हत्या, व अवैध गर्भपात रॅकेट उघड केले होते. दरम्यान, या प्रकरणाचा योग्य तपास करावा, दोषींवर कडक कारवाई व्हावी, अन्यथा जनहित याचिका दाखल केली जाईल, असा इशारा मनसेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब कदम यांनी निवेदनाव्दारे दिला आहे.
या प्रकरणाचा तपास योग्यरित्या होत नाही. याकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण शाखेच्या वतीने आंदोलन केले होते. त्याची दखल घेत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली आहे.
बांबवडे येथील पिशवी रोडवरील आनंद हॉस्पीटलमध्ये अवैध गर्भपात रॅकेट चालत असल्याचा सुगावा जिल्हा आरोग्य पथकास लागला होता. त्यानंतर डॉ. सुप्रिया देशमुख, आरोग्य अधिकारी डॉ. हर्षला वेधक, निवासी आरोग्य अधिकारी डॉ. सुनंदा गायकवाड, मलकापूर ग्रामीण रूग्णालयाचे डॉ. एच. आर. निरंकारी, तालुका आरोग्य अधिकारी मुल्ला आष्टेकर यांनी १६ जानेवारी २०२४ रोजी हॉस्पीटलवर धाड टाकून हा प्रकार उघड केला होता. तर डॉक्टर मनोज नाईक यास रंगेहात पकडले होते.
दरम्यान, डॉ. मनोज नाईक यांच्यावर कारवाई होत नव्हती, तो पथकाच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता. त्या पार्श्वभूमीवर डॉक्टरवर कारवाई व कर्तव्यात कसूर ठेवलेल्या दोषींच्या चौकशीसाठी मनसेच्या वतीने बांबवडे येथे आंदोलन करण्यात आले होते.
हेही वाचा 

कोल्हापूर : गर्भलिंग निदानप्रकरणी 16 वर्षांत 22 खटले
कोल्हापूर : ढसाढसा रडत जयकुमार शिंदे यांचा राजकीय संन्यास
कोल्हापूर : रोज 200 एमएलडी विषाक्त पाणी पंचगंगेत