Nagar : चोरांची टोळी गजाआड ; आरोपी जालना व पुण्याचे
नगर : पुढारी वृत्तसेवा : देवगड फाट्यावर वाहनचालकांना मारहाण करून जबरी चोरी केल्याच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तिघांना जेरबंद केली. शाहरुख सत्तार खान (वय 23, रा. पानीविस कॉलनी, ता. जि. जालना, दीपक लक्ष्मण भुसारे (वय 27, रा. गोकुळवाडी, ता. जि. जालना), ओंकार ऊर्फ मंथन प्रफुल्ल ताठिया (वय 22, रा. वडगाव बु, ता. जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अधिक माहिती अशी, पिकअप चालक अजित सिद्राम गुळवे (वय 26, रा. शिंगोणी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांना 19 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री वाहन चालविताना झोप आल्याने त्यांनी छत्रपती संभाजीनगर ते अहमदनगर रस्त्यावरील देवगड फाटा येथे पिकअप व्हॅन उभी केली आणि आत झोपले. त्या वेळी तीन अनोळखी तरुणांनी त्यांना उठविले. त्यांना व क्लीनरला जिवे मारण्याची धमकी देत मोबाईलसह 73 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत अजित गुळवे यांच्या फिर्यादीवरून नेवासे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला स्वतंत्र पथक नेमून तपास करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिस पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून, माहिती घेतली. तांत्रिक विश्लेषण करीत असताना खबर्यामार्फत माहिती मिळाली, की हा गुन्हा शाहरुख खान याने साथीदारांसह केला आहे. पथकाने तत्काळ त्याला जालना येथून ताब्यात घेतले. त्याने अन्य साथीदारांची नावे सांगितली. दीपक भुसारे याला जालना येथून, तर, ओंकार ताठिया याला पुण्यातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 54 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे दिनेश आहेर, उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलिस कर्मचारी दत्तात्रय गव्हाणे, रवींद्र कर्डिले, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, फुरकान शेख, संतोष खैरे, किशोर शिरसाठ, प्रशांत राठोड, संभाजी कोतकर यांच्या पथकाने केली.
The post Nagar : चोरांची टोळी गजाआड ; आरोपी जालना व पुण्याचे appeared first on पुढारी.
नगर : पुढारी वृत्तसेवा : देवगड फाट्यावर वाहनचालकांना मारहाण करून जबरी चोरी केल्याच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तिघांना जेरबंद केली. शाहरुख सत्तार खान (वय 23, रा. पानीविस कॉलनी, ता. जि. जालना, दीपक लक्ष्मण भुसारे (वय 27, रा. गोकुळवाडी, ता. जि. जालना), ओंकार ऊर्फ मंथन प्रफुल्ल ताठिया (वय 22, रा. वडगाव बु, ता. जि. पुणे) …
The post Nagar : चोरांची टोळी गजाआड ; आरोपी जालना व पुण्याचे appeared first on पुढारी.