माेठी बातमी : प्रयागराजमध्ये राहुल आणि अखिलेश यांच्या सभेत चेंगराचेंगरी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या जाहीर सभेत आज( दि.१९) चेंगराचेंगरी झाली. कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्स तोडून व्‍यासपीठावर येण्‍याचा प्रत्‍यन केला यामुळे एकच गाेंधळ उडाला, असे वृत्त ANIने दिले आहे. अनेक कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी चेंगराचेंगरीत जखमी फुलपूर लोकसभा मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे उमेदवार अमरनाथ …

माेठी बातमी : प्रयागराजमध्ये राहुल आणि अखिलेश यांच्या सभेत चेंगराचेंगरी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या जाहीर सभेत आज( दि.१९) चेंगराचेंगरी झाली. कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्स तोडून व्‍यासपीठावर येण्‍याचा प्रत्‍यन केला यामुळे एकच गाेंधळ उडाला, असे वृत्त ANIने दिले आहे.
अनेक कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी चेंगराचेंगरीत जखमी
फुलपूर लोकसभा मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे उमेदवार अमरनाथ सिंह मौर्य यांच्या समर्थनार्थ पडिला मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्‍यात आले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव मंचावर पोहोचताच गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. जमाव बॅरिकेड्स तोडून स्टेजवर पोहोचला. माइकची वायर तुटली. विजेची तार तुटली. अनेक कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी चेंगराचेंगरीत जखमी झाले.
राहुल गांधी, अखिलेश यादव सभा न घेताच निघून गेले
पडिला मैदानावर आयाेजित जाहीर सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विधानसभा अध्यक्ष अखिलेश यादव यांना पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्स तोडून सभेत प्रवेश केला. कार्यकर्त्यांनी व्‍यासपीठावर चढण्‍याचा प्रयत्‍न केला.
राहुल गांधी आणि अखिलेश कार्यकर्ते आणि समर्थकांची समजूत काढत राहिले पण गर्दीवर नियंत्रण ठेवता आलं नाही. दोन्ही नेते जवळपास 20 मिनिटे येथे थांबले आणि त्यानंतर कोणतेही भाषण न करता हेलिकॉप्टरमधून निघून गेले.

#WATCH | Uttar Pradesh: A stampede-like situation took place in the joint public meeting of Congress MP Rahul Gandhi and Samajwadi Party chief Akhilesh Yadav at Phulpur constituency, in Prayagraj.
Rahul Gandhi and Akhilesh Yadav left the public meeting without addressing the… pic.twitter.com/fPW2tgaWOP
— ANI (@ANI) May 19, 2024

राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांची मुंगारीला सभा
फूलपूर येथून राहुल गांधी आणि सपा प्रमुख अखिलेश यादव रविवारी दुपारी २ वाजता करचना विधानसभा मतदारसंघातील मुंगारी गावात पोहोचले. येथे ‘इंडिया’ आघाडीचे उमेदवार उज्ज्वल रमण सिंह यांच्या समर्थनार्थ सभेचे आयोजन करण्‍यात आले होते. या सभेमध्‍ये दोन्ही नेत्‍यांनी भाषण केले.