आयपीएलच्या इतिहासात ‘असे’ पहिल्यांच घडले, जाणून घ्या नवा विक्रम
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2024च्या प्लेऑफमध्ये पोहोचणाऱ्या चार संघांची घोषणा करण्यात आली आहे. कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. यासोबतच आयपीएलमध्ये एक इतिहास रचला गेला आहे, ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. आयपीएलमध्ये गेल्या मोसमातील अव्वल 4 संघांपैकी एकही संघ प्लेऑफमध्ये न पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावर विश्वास ठेवणे कुणालाही कठीण जाऊ शकते.
आयपीएल 2023 च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले होते, परंतु हे संघ यंदाच्या हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचू शकलेले नाहीत. यावेळी केकेआर, आरआर, एसआरएच आणि आरसीबी यांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. अशाप्रकारे, गेल्या हंगामात प्लेऑफसाठी पात्र ठरल्यांपैकी एकही संघ यंदाच्या अव्वल 4 मध्ये नाही.
मात्र, या हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या संघांकडे पाहता एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, यावेळीही नवा चॅम्पियन मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. यात आरसीबीचा संघ अपवाद ठरू शकतो. या संघाचे नशीब चांगले असेल तर आयपीएलचा तो नवा चॅम्पियन ठरू शकतो. पण, कोलकाता, राजस्थान किंवा हैदराबादने विजेतेपद पटकावले, तर यंदाच्या हंगामात एकही नवीन चॅम्पियन मिळणार नाही, कारण या संघांनी प्रत्येकी एकदा तरी विजेतेपद पटकावले आहे. आरआरने 2008 मध्ये, केकेआरने 2012 आणि 2014 मध्ये आणि एसआरएचने 2016 मध्ये मध्ये IPL चे विजेतेपद जिंकले आहे.