पंतप्रधान मोदी चर्चेपासून दूर पळतात, राहुल गांधींचा हल्लाबोल
नवी दिल्ली; Bharat Live News Media वृत्तसेवा : दोन माजी न्यायमूर्ती आणि वरीष्ठ पत्रकार यांनी सुचवलेल्या चर्चेपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी दूर पळतात, त्यांच्याकडे चर्चा करण्याचे धाडस नाही,” असे म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधींनी दिल्लीत पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला. या लोकसभा निवडणुकीतील दिल्लीतील त्यांची ही पहिलीच सभा होती.
शनिवारी संध्याकाळी दिल्लीत सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती आहे की, माझ्यासोबत वादविवाद करण्याचे धाडस ते करू शकत नाहीत, कारण जे प्रश्न त्यांना विचारले जाणार आहेत त्यांची उत्तरे त्यांच्याकडे नाहीत.”
राहुल गांधी म्हणाले की, “मोदींना त्यांचा पहिला प्रश्न अदानीसोबतच्या त्यांच्या खास संबंधांबद्दल असेल. दुसरा प्रश्न इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून खंडणीवर असेल. तिसरा प्रश्न शेतीशी संबंधित तीन काळे कायद्यांविषयी असेल. हजारोंच्या संख्येने लोक मरत असताना आणि गंगा नदीत मृतदेह वाहत असताना कोविडच्या काळात त्यांनी लोकांना ताट वाजवायला का सांगितले, हेही पंतप्रधान मोदींना विचारणार आहे,” असे राहुल गांधी म्हणाले.
“काँग्रेस-आम आदमी पक्षासह इंडिया आघाडीत एकत्र निवडणूक लढवत आहे. मी स्वतः झाडू या चिन्हावर मतदान करणार आहे तर अरविंद केजरीवाल काँग्रेसच्या पंजा या चिन्हाला मतदान करणार आहेत, असे म्हणत सातही लोकसभा क्षेत्रांमधून इंडिया आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित त्यांना केले. तसेच यावेळी अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत यूपीए सरकारच्या काळात काँग्रेसने सुरू केलेला गरिबांसाठी मोफत रेशन सध्याच्या ५ किलोवरून दुप्पट करण्यात येईल, जीएसटीचे सुलभिकरण करण्यात येईल,” असेही ते म्हणाले.


Home महत्वाची बातमी पंतप्रधान मोदी चर्चेपासून दूर पळतात, राहुल गांधींचा हल्लाबोल
पंतप्रधान मोदी चर्चेपासून दूर पळतात, राहुल गांधींचा हल्लाबोल
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : दोन माजी न्यायमूर्ती आणि वरीष्ठ पत्रकार यांनी सुचवलेल्या चर्चेपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी दूर पळतात, त्यांच्याकडे चर्चा करण्याचे धाडस नाही,” असे म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधींनी दिल्लीत पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला. या लोकसभा निवडणुकीतील दिल्लीतील त्यांची ही पहिलीच सभा होती. शनिवारी संध्याकाळी दिल्लीत सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, …