सिंधुदुर्ग : कणकवलीत अवकाळी पावसाची दमदार हजेरी
नांदगाव; Bharat Live News Media वृत्तसेवा : कणकवली तालुक्यात नांदगाव, तळेरे परिसरात अवकाळी पाऊसाने शनिवारी (दि.18) सायंकाळी चांगलीच हजेरी लावली. गेले काही दिवस हुलकावणी देणारा पाऊस पडल्याने अनेक परिसरात पाणी साचले होते. तर, परिसरात गारवा निर्माण झाला होता. अवकाळी पावसामुळे वीज पुरवठा उशिरापर्यंत खंडीत झाला होता.
अवकाळी पावसाने कणकवली तालुक्यात हजेरी लावली तर, नांदगाव, तळेरेसह परिसरात गावात तुरळक हजेरी लावली. शनिवारी अवकाळी पाऊसाने नांदगाव परिसरात साडेतीन पासून चांगलीच हजेरी लावली. तर, तळेरे परिसरात पाचपासून दमदार हजेरी लावली.
यामुळे महामार्गासह इतर स्थानिक मार्गावर पाणी साचले होते. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडित झाला होता. यासह पावसामुळे रस्त्यावर पाणी साठल्यामुळे एस.टी.व खाजगी बसची वाट पाहत असताना चांगलीच दमछाक झाली. तर मार्गालगत असणाऱ्या फळ विक्रेत्यांना दुकाने बंद ठेवण्याची वेळ आली. दमदार पाऊसामुळे वातावरण गारवा निर्माण झाला असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरीकांना दिलासा मिळाला आहे.