पुढारी ऑनलाईन डेस्क : निखिल अडवाणी दिग्दर्शित आणि बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, प्रीती झिंटा आणि सैफ अली खान यांच्या ‘कल हो ना हो’ (Kal Ho Naa Ho) या चित्रपटाला रिलीज होऊन नुकतेच २० वर्षे उलटली आहेत. हा चित्रपट २८ नोव्हेंबर २००३ रोजी रिलीज झाला होता. आज म्हणजे, २८ नोव्हेबर २०२३ रोजी २० वर्ष पूर्ण झाले आहेत. या चित्रपटातील सर्वच कलाकारांनी उत्तमरित्या भूमिका साकरल्या होत्या. त्या आजही चाहत्याच्या मनात घर करून आहेत. या खास दिवसाची आठवण काढत बॉलिवूड अभिनेता करण जोहरने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. दरम्यान करणने त्याच्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
संबंधित बातम्या
IFFI 2023 : ‘एंडलेस समर सिंड्रोम’ हा चित्रपट प्रेक्षकांनी अनुभवावा : लिंडसे टेलर स्टुअर्ट
तुला शिकवीन चांगलाच धडा : अक्षरा आणि भुवनेश्वरी आमने सामने
Randeep Hooda Wedding : रणदीपच्या लग्नाची जोरदार तयारी ; लिन लॅशरामसोबत देव दर्शनाला
अभिनेता करण जोहरने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडिओत ‘कल हो ना हो’ या चित्रपटातील गाणे आणि काही डॉयलॉग दाखविले आहेत. तर प्रीती झिंटा आणि शाहरुख खान दोघांमधील लव्हस्टोरी पाहायला मिळत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये करण जोहरने भली मोठी पोस्ट करत लिहिले आहे की, ”कल हो ना हो’ हा चित्रपट माझ्यासाठी आणि कदाचित सर्व चाहत्यांसाठी एक भावनिक प्रवास आहे. या चित्रपटातून दिग्गज कलाकारांना एकत्रित आणणे आव्हानात्मक होते. परंतु, दिग्दर्शकांनी मेहनतीने जुळवून आणले. चित्रपटाचे संपूर्ण टीम आणि कॅमेऱ्याच्या मागील कलाकारांचे खूपच अभिनंदन. ज्यांनी ‘कल हो ना हो’ हा चित्रपट बनवला.’
‘माझ्यासाठी हा शेवटचा चित्रपट आहे, कारण ‘कल हो ना हो’ या चित्रपटात माझ्या वडिलांनी धर्मा परिवारातील सदस्य म्हणून काम केलं आहे. जेव्हा- जेव्हा मी पुन्हा चित्रपट पाहतो तेव्हा- तेव्हा मला माझ्या वडिलांची आठवण येते. धन्यवाद बाबा. आम्हाला प्रत्येक गोष्टीत मार्गदर्शन आणि कथा तयार करण्यास मदत केल्याबद्दल. जे योग्य आहे त्यासाठी नेहमी पाठिशी उभे राहिल्याबद्दल. तसेच दिग्दर्शनात पदार्पण केल्याबद्दल निखिलचे आभार!’, असेही करणने यात म्हटलं आहे.
‘कल हो ना हो’ (Kal Ho Naa Ho) या चित्रपटाचे बजेट जवळपास २८ कोटींचे होते. या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर भारतात बॉक्स ऑफिसवर ३८. ८५ कोटी आणि जगभरात ८२.०५ कोटींची कमाई केली होती. अभिनेत्री जया बच्चन, दारा सिंह, झनक शुक्ला आणि सोनाली ब्रेंद्रे हे कलाकारांनी या चित्रपटात भूमिका साकरल्या आहेत.
View this post on Instagram
A post shared by Karan Johar (@karanjohar)
The post ‘कल हो ना हो’ ची २० वर्षे; आठवणींनी करण जोहर भावूक appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : निखिल अडवाणी दिग्दर्शित आणि बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, प्रीती झिंटा आणि सैफ अली खान यांच्या ‘कल हो ना हो’ (Kal Ho Naa Ho) या चित्रपटाला रिलीज होऊन नुकतेच २० वर्षे उलटली आहेत. हा चित्रपट २८ नोव्हेंबर २००३ रोजी रिलीज झाला होता. आज म्हणजे, २८ नोव्हेबर २०२३ रोजी २० वर्ष पूर्ण झाले …
The post ‘कल हो ना हो’ ची २० वर्षे; आठवणींनी करण जोहर भावूक appeared first on पुढारी.