अग्रवाल मेमोरिअल स्कूलचा शंभर टक्के निकाल

पिंपळनेर,जि.धुळे : पुढारी वृत्तसेवा – सि.बी.एस.ई.बोर्डाने फेब्रुवारी-2024 मध्ये झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या निकालात पिंपळनेर येथील धर्मिबाई गिरीराज अग्रवाल मेमोरिअल स्कूल या शाळेचा शंभर टक्के निकाल लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विद्यार्थी हर्ष माधवराव राठोड 94 टक्के गुण मिळवून …

अग्रवाल मेमोरिअल स्कूलचा शंभर टक्के निकाल

पिंपळनेर,जि.धुळे : Bharat Live News Media वृत्तसेवा – सि.बी.एस.ई.बोर्डाने फेब्रुवारी-2024 मध्ये झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या निकालात पिंपळनेर येथील धर्मिबाई गिरीराज अग्रवाल मेमोरिअल स्कूल या शाळेचा शंभर टक्के निकाल लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विद्यार्थी हर्ष माधवराव राठोड 94 टक्के गुण मिळवून प्रथम आला असून भार्गवी प्रशांत जाधव 91 टक्के गुण मिळवून द्वितीय आली आहे. भार्गवी सुधीर मराठे व अनुष्का सचिन देसले यांनी 90  टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. आयुष प्रमोद कोतकर, कावेरी दिनेश चव्हाण यांनी 89 टक्के गुण घेत चतुर्थ क्रमांक तर हितेश रघुनाथ गांगुर्डे व समीक्षा नारायण येवले यांनी 88 टक्के गुण घेत पाचवा क्रमांक मिळवला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष निरंजन ओमप्रकाश अग्रवाल, उपाध्यक्ष संतोष राधेश्याम शर्मा तसेच संचालक मनीष ओमप्रकाश अग्रवाल, अधिष्ठाता निलेश्वरी निरंजन अग्रवाल व प्रशासक बिजू के. अब्राहम, मुख्याध्यापिका रजनी बिजु अब्राहम तथा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वितांचे  कौतुक केले आहे.
हेही वाचा:

तरुणासह अल्‍पवयीन मेहुणीचा कोठडीत मृत्‍यू, बिहारमधील अररियात जमावाने पोलीस ठाणे पेटवले
Stock market holiday | NSE आणि BSE २० मे रोजी राहणार बंद, जाणून घ्या कारण
Nitin Gadkari Nashik | नितीन गडकरी श्री काळाराम चरणी लीन