शेअर बाजार २० मे रोजी राहणार बंद, जाणून घ्या कारण

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत २० मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी २० मे रोजी बीएसई आणि एनएसई स्टॉक एक्सचेंज बंद राहणार आहे. यामुळे कॅश मार्केट अथवा F&O विभागामध्ये कोणतेही व्यवहार होणार नाहीत. यामध्ये इक्विटी, कमोडिटी किंवा करन्सी कॉन्ट्रॅक्ट्स समावेश आहे. निगोशिएबल इन्स्ट्रमेंट्स अ‍ॅक्ट १८८१ च्या …

शेअर बाजार २० मे रोजी राहणार बंद, जाणून घ्या कारण

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत २० मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी २० मे रोजी बीएसई आणि एनएसई स्टॉक एक्सचेंज बंद राहणार आहे. यामुळे कॅश मार्केट अथवा F&O विभागामध्ये कोणतेही व्यवहार होणार नाहीत. यामध्ये इक्विटी, कमोडिटी किंवा करन्सी कॉन्ट्रॅक्ट्स समावेश आहे.
निगोशिएबल इन्स्ट्रमेंट्स अ‍ॅक्ट १८८१ च्या कलम २५ अंतर्गत निवडणुकीत नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे रोजी असे पाच टप्प्यांत लोकसभा निवडणुका होणार असल्याची घोषणा केली होती. ८ एप्रिल रोजीच, NSE आणि BSE ने २० मे रोजी मुंबईत होणाऱ्या पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी शेअर बाजाराला सुट्टी जाहीर केली होती.
२० मे रोजी राज्यातील मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य आणि मुंबई दक्षिणसह धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण आणि ठाणे या १३ लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.
बीएसईच्या वेबसाइटनुसार, इक्विटी सेगमेंट, इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंट आणि एसएलबी सेगमेंट २० मे रोजी बंद राहतील. NSE ने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, मुंबईत होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमुळे सोमवारी २० मे रोजी ट्रेडिंगला सुट्टी असेल. या दिवशी इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्ह आणि सिक्योरिटीज लेंडिंग आणि बॉरोइंग सेगमेंटमध्ये कोणताही व्यवहार होणार नाही. याची सदस्यांनी नोंद घ्यावी.
NSE holiday dates
BSE आणि NSE वेबसाइट्सवरील माहितीनुसार, भारतीय शेअर बाजार मंगळवार, २१ मे रोजी सकाळी ९ वाजता सुरू होणाऱ्या पंधरा मिनिटांच्या प्री-ओपनिंग सत्रानंतर सकाळी ९:१५ वाजता सामान्यपणे व्यवहार सुरू करेल.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (MCX) देखील सकाळच्या सत्रांमध्ये म्हणजेच सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत व्यवहारासाठी सोमवारी बंद राहणार आहे.
हे ही वाचा :

शनिवारच्या स्पेशल ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स-निफ्टी वाढीसह बंद
म्युच्युअल फंड केवायसी नियमात बदल, जाणून घ्या अधिक

Go to Source