डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांनी केले गृहमतदान
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : देशभरात लोकसभा निवडणुका पार पडत आहेत. दरम्यान माजी उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून गृहमतदान करत मतदानाचा हक्क बजावला. lok sabha election 2024
लाेकसभा निवडणूक २०२४
यंदा लोकसभा निवडणुका देशभरात सात टप्प्यात मतदान होत आहे.
देशातील सर्व राज्यातील लोकसभा निवडणूक निकाल ४ जूनला जाहीर.
माजी उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आदींनी गृह मतदान केले.
यंदा लोकसभा निवडणुक मतदान देशभरात सात टप्प्यात होत आहे. सात टप्प्यामधील १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे आणि १३ मे या चार टप्प्यात मतदान झाले आहे. तर पाचवा टप्पा २० मे, सहावा टप्पा २५ मे आणि सातव्या ट्प्प्यासाठी १ जून या दिवशी मतदान होणार आहे. तर देशातील सर्व राज्यातील लोकसभा निवडणूक निकाल ४ जूनला जाहीर होणार आहे.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग
दिल्लीत २५ मे राेजी हाेणार मतदान
दिल्ली संसदीय मतदारसंघाचे मतदान हे सहाव्या टप्प्यात म्हणजे २५ मे रोजी होत आहे. दरम्यान, माजी उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी नवी दिल्ली संसदीय मतदारसंघातून गृहमतदान करत मतदानाचा हक्क बजावला. असे दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.
माजी उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी
मतदानापूर्वी गृहमतदान
दरम्यान, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोग नेहमी प्रयत्न करत असतं. केंद्रीय निवडणूक आयोगाने ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, कोव्हीड-19 रुग्ण मतदार तसेच ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या मतदारांसाठी गृह मतदान पथकामार्फत मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. lok sabha election 2024
माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी
#LokSabhaElections2024 : Former Vice President Mohammad Hamid Ansari, former Prime Minister, Dr Manmohan Singh and former Union Minister Dr Murli Manohar Joshi avail home voting facility from New Delhi Parliamentary Constituency: Chief Electoral Officer, Delhi
Delhi will vote on… pic.twitter.com/Tbb0d9LUQl
— ANI (@ANI) May 18, 2024
हेही वाचा
Delhi Lok Sabha: अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या लोकसभा निवडणूकीचा मूड बदलला
Lok Sabha Election 2024 | ‘एकच प्याला’ ४८ तास राहणार रिकामा ! ‘या’ ठिकाणी दारूबंदी