नितीन गडकरी श्री काळाराम चरणी लीन
पंचवटी : Bharat Live News Media वृत्तसेवा- केंद्रीय रस्ते, वाहतूक व राजमार्गमंत्री नितीन गडकरी यांनी श्री काळाराम मंदिरात महापूजा, अभिषेक करून प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन घेतले. महंत सुधीर पुजारी यांनी प्रधान संकल्प सोडला. यावेळी महावस्त्र व प्रसाद देऊन गडकरी यांचा सत्कार करण्यात आला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारानिमित्त गडकरी नाशिकला आले होते. त्यावेळी श्री काळाराम मंदिर संस्थानच्या वतीने प्रभू श्रीरामचंद्रांची प्रतिमा विश्वस्त धनंजय पुजारी, मंदार जानोरकर, ॲड. अजय निकम, शुभम मंत्री यांनी त्यांना प्रभू श्रीरामाची प्रतिमा भेट दिली. विश्वस्त व भाविकदेखील यावेळी उपस्थित होते.