अफगाणिस्तानात पुरामुळे हाहाकार, ५० जणांचा मृत्यू
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात अचानक अवकाळी पावसामुळे आलेल्या पुरामुळे हाहाकार उडाला आहे. यात किमान ५० जणांचा मृत्यू झाला आहे. या पुरामुळे सुमारे २ हजार घरे उद्ध्वस्त झाली आहेत, अशी माहिती प्रांतीय पोलिसांनी शनिवारी दिली. “घोर प्रांतातील ५० रहिवाशांचा शुक्रवारी पुरामुळे मृत्यू झाला आणि अनेकजण बेपत्ता आहेत,” असे घोर प्रांत पोलिसांचे प्रवक्ते अब्दुल रहमान बद्री यांनी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.
“या पुरामुळे हजारो जनावरे दगावली आहेत. तसेच शेकडो हेक्टरवरील शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. अनेक पूल वाहून गेले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली आहे. या प्रांतात अनेक रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे.” असेही पुढे सांगण्यात आले आहे.
जागतिक अन्न कार्यक्रम आणि तालिबानमधील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठवड्यात उत्तर बाघलान प्रांतात अचानक आलेल्या पुरामुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. आता पश्चिम भागाला पुराचा तडाखा बसला आहे.
तालिबानच्या सरकारच्या मुख्य प्रवक्त्याने X वरील पोस्टमध्ये अफगाणमधील जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले आहे. पूरगस्त लोकांना सर्व आवश्यक मदत पुरविण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.
Flash flooding has killed at least 50 people in western Afghanistan, provincial police said Saturday.
The floods destroyed some 2,000 houses and damaged thousands more, they added.
Read more: https://t.co/dwDL734obN pic.twitter.com/bnSRo6dEMQ
— AFP News Agency (@AFP) May 18, 2024
हे ही वाचा :
इस्रायलच्या रणगाड्यांनी आपल्याच पाच सैनिकांना उडवले
‘भारत चंद्रावर पोहचला आणि आमची मुले..’:पाकच्या खासदारांनी मांडले वास्तव