रेल्वे बोगीच्या चाकाखालून धूर, घाबरुन प्रवाशांच्या खिडकीतून उड्या

इगतपुरी(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव जवळील जिंदाल कंपनी समोर गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून धूर निघाल्याने एकच खळबळ उडाली. गाडी थांबल्यावर गाडीतील प्रवाशांनी घाबरून खिडकीतून उड्या टाकल्या. याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईला जाणारी गोरखपुर लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस शनिवार दि. १८ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मुंबईकडे जात असतांना मुंढेगाव जवळ गोदान एक्स्प्रेसच्या …

रेल्वे बोगीच्या चाकाखालून धूर, घाबरुन प्रवाशांच्या खिडकीतून उड्या

इगतपुरी(जि. नाशिक) : Bharat Live News Media वृत्तसेवा– इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव जवळील जिंदाल कंपनी समोर गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून धूर निघाल्याने एकच खळबळ उडाली. गाडी थांबल्यावर गाडीतील प्रवाशांनी घाबरून खिडकीतून उड्या टाकल्या.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईला जाणारी गोरखपुर लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस शनिवार दि. १८ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मुंबईकडे जात असतांना मुंढेगाव जवळ गोदान एक्स्प्रेसच्या बोगीच्या खाली असलेले लायनर ओव्हर हीट होऊन घासल्याने मोठा धूर निघाल्याने गार्ड आणि चालकाने प्रसंगावधान राखत गाडी थांबवली होती. मात्र डब्या खालून धुर निघत असल्याचे पाहुन काही प्रवाशांची गाडीतून उड्या मारल्या. मात्र कोणतीही आग लागली नसल्याची खात्री झाल्यावर सदरची एक्सप्रेस इगतपुरीकडे रवाना करण्यात आली. गाडी इगतपुरी स्थानकात आल्यानंतर गाडीच्या बोगीच्या लायनरची दुरुस्ती करून गाडी मुंबईच्या दिशेने रवाना झाली.
हेही वाचा –

Jalgaon Crime News : अल्पवयीन मुलगी घरात एकटी पाहून अतिप्रसंग करणाऱ्याला सश्रम कारावास
Crime news | चार महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून खून..!