उत्तर भारतात तीव्र उष्णतेची लाट, दक्षिणेत मुसळधारेचा इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताच्या वायव्येकडील मैदानी भागात आजपासून (दि.१८ मे) पुढील ५ दिवस उष्णतेच्या ते तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा (Heat wave) देण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने उत्तर-पश्चिम भारतातील मैदानी भागात पुढील ५ दिवसांत उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता …

उत्तर भारतात तीव्र उष्णतेची लाट, दक्षिणेत मुसळधारेचा इशारा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारताच्या वायव्येकडील मैदानी भागात आजपासून (दि.१८ मे) पुढील ५ दिवस उष्णतेच्या ते तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा (Heat wave) देण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने उत्तर-पश्चिम भारतातील मैदानी भागात पुढील ५ दिवसांत उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच पुढील ३ दिवसांत पूर्व आणि मध्य भारतात उष्णतेची लाट (Heat wave) राहण्याची शक्यता आहे, असे देखील सांगितले आहे.

Heat wave to severe heat wave conditions likely to continue over plains of Northwest India during next 5 days and Heat wave conditions likely over East & Central India during next 3 days: India Meteorological Department pic.twitter.com/6Q3uQNeF0G
— ANI (@ANI) May 18, 2024

राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीसह उत्तर भारतातील बहुतांशी भागात शुक्रवार १७ ते मंगळवार २१ मे दरम्यान उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.
दक्षिणेकडील राज्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
भारतीय दक्षिण द्वीपकल्पीय प्रदेशातील बहुतांश राज्यात रविवार १९ मे ते मंगळवार २१ मे रोजी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दक्षिणेतील तमिळनाडू आणि केरळमध्ये  या दरम्यान अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
१९ मे रोजी मान्सून अंदमानमध्ये
नैऋत्य मान्सून १९ मे २०२४ च्या सुमारास दक्षिण अंदमान समुद्र, आग्नेय बंगालच्या उपसागराचा काही भाग आणि निकोबार बेटांवर जाण्याची दाट शक्यता आहे. २२ मे च्या सुमारास नैऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. ते सुरुवातीला ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे आणि २४ मेच्या सुमारास बंगालच्या उपसागराच्या मध्यवर्ती भागांवर दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे, असे देखील हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे.