महामार्ग रस्त्यावर तात्पुरते स्पीड ब्रेकर, प्राधिकरणाला संपर्क केल्यास नो रिप्लाय

जळगाव पुढारी वृत्तसेवा- भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरण यांच्याकडून स्वच्छ चिखली हा चौपदरी महामार्ग बनवण्यात आलेला आहे. मात्र या रस्त्यावरील काम बाकी असल्याने तो पूर्ण झालेला नाही. असे असतानाही भुसावळ येथील नाटक कॉलेज चौफुली वरील ओव्हर ब्रिजवर दुचाकी रस्त्यावर कचऱ्याच्या स्वरुपात तात्पुरते स्पीड ब्रेकर बनलेले दिसून येत आहे. भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरण अधिकारी व …

महामार्ग रस्त्यावर तात्पुरते स्पीड ब्रेकर, प्राधिकरणाला संपर्क केल्यास नो रिप्लाय

जळगाव Bharat Live News Media वृत्तसेवा- भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरण यांच्याकडून स्वच्छ चिखली हा चौपदरी महामार्ग बनवण्यात आलेला आहे. मात्र या रस्त्यावरील काम बाकी असल्याने तो पूर्ण झालेला नाही. असे असतानाही भुसावळ येथील नाटक कॉलेज चौफुली वरील ओव्हर ब्रिजवर दुचाकी रस्त्यावर कचऱ्याच्या स्वरुपात तात्पुरते स्पीड ब्रेकर बनलेले दिसून येत आहे. भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरण अधिकारी व कर्मचाऱ्यांना मात्र हे उचलण्याचा विसर पडलेला आहे. यामुळे या ठिकाणी अपघात होऊन जीवित हानी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. तरीसुद्धा अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता व्यस्त असल्याचे उत्तर मिळत आहे.
जळगाव जिल्ह्यातील तरसोद ते चिखली राष्ट्रीय महामार्ग मार्गाचे काम काही वर्षांपूर्वी सुरू झाले होते. हा रस्ता व महामार्ग बनवण्याचे काम सुरू झाल्यापासून काही ना काही वादामध्ये तो सापडलेला आहे. असे असताना जवळपास 95 टक्के रस्त्याचे काम झालेले आहे. मात्र या रस्त्यावरील मुख्य ओवर ब्रिज असलेला नशिराबाद येथील रेल्वे लाईन वरील पुलाचे एकाच तर्फे काम पूर्ण झालेले आहे. या पुलावरूनच दोन्हीकडची वाहतूक गेल्या दोन ते तीन वर्षापासून सुरू आहे. आता कुठे यावर ब्रिजच्या दुसऱ्या बाजूच्या फुलाचे काम सुरू झालेले आहे, असे असताना भुसावळ येथील नाटक कॉलेज चौफुली वरील ओवर ब्रिज निर्माण झालेला यावरील वाहतुकीची सुरू आहे.
मात्र या ठिकाणी दुचाकी वाहनांना जी लाईन देण्यात आलेली आहे. त्या लाईनवर पुलाच्या भुसावळ कडे येताना व जळगाव कडे जातानाच्या दोन्ही बाजूने साई सफाई करण्यात आलेले रेतीचे ढीग व कचऱ्याचे ढीग त्या ठिकाणी न उचलता ठेवून देण्यात आलेले आहेत. यामुळे रात्री कोणते दुचाकी वाहन किंवा तीन चाकी वाहन या रस्त्याने वेगाने आल्यानंतर यावरून गेल्यास मोठा अपघात होऊ शकतो व तो वाहन चालक आपले प्राण गमवू शकतो.
मात्र सदरील हा रस्ता साफसफाई करणारे कर्मचारी अधिकारी याकडे सपशेल दुर्लक्ष करीत आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना व संचालक शिवाजी पवार यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला असता रिंग वाजल्यावरील फोन कट करण्यात आला यावरून नाही चे अधिकारी किती सतर्क व सक्षम आहे हे लक्षात येत आहे.
शनिवार- रविवार सुट्टी असल्याने तीही शासकीय सुट्टी असल्याने नागरिकांच्या जीवापेक्षा आपल्या सुट्टीला महत्त्व देणारे अधिकारी या ठिकाणी असल्याचे निदर्शनास येते.
या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 व अपघात झाल्यास कोणत्या व्यक्तीशी संपर्क साधावा कोणता यंत्रणेला सांगावे संबंधित पोलीस स्टेशनचे नंबर तेथील अधिकाऱ्यांचे नंबर ॲम्बुलन्स नंबर 24 तास साठी असलेले नंबर याचे कोणतेही सूचनाफलक रस्त्यांच्या दोन्ही बाजूने दिसून येत नाही. कारण जळगाव ते भुसावळ यामध्ये टोलनाका येत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांना याची गरज वाटत नसल्याचे दिसून येत आहे.