Crime news | चार महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून खून..!
जुन्नर : Bharat Live News Media वृत्तसेवा : चार महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एकाने केलेल्या जबर मारहाणीत शेतमजूराचा मृत्यू झाला. ही घटना जुन्नर तालुक्यातील खानगाव येथे बुधवारी (दि.15) रात्री घडली. तुकाराम गाडेकर (रा. खानगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जुन्नर पोलिसांनी सोमनाथ रोहिदास गंभीरे (वय 30, रा. बुळेवाडी (पैठण) ता.अकोले) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या शेतमजूराचे नाव सुनील (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) असे आहे.
आरोपी सोमनाथ व मयत सुनील हे दोघे एकमेकांचे मित्र होते. मिळालेल्या माहितीनुसार, चार महिन्यांपूर्वी आळंदी येथे सुनील व त्याच्या मित्रांनी सोमनाथ यास मारले होते. हा राग मनात ठेवून त्याने सुनीलला आळेफाटा येथून खानगाव येथे आणले होते. बुधवारी रात्री शेतातील पडवीमध्ये दोघांमध्ये जुन्या भांडणावरून वाद झाला. या वेळी सोमनाथने लाकडी दांडक्याने सुनीलला जबर मारहाण करून त्याला जिवे मारले होते.
खुनाच्या घटनेनंतर उपसरपंच सुभाष कामटकर, पंचायत समितीचे माजी सदस्य दिलीप गांजाळे, पोलिस पाटील शिवराम जाधव, राजू गाडे, खंडू कामटकर यांसह ग्रामस्थांनी सोमनाथ यास पकडून ठेवत जुन्नर पोलिसांना याबाबत माहिती दिली. दरम्यान, पोलिस मयत सुनील याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. याबाबत कुणाला माहिती असल्यास जुन्नर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी केले.
हेही वाचा
पहिल्याच पावसात रस्त्यावर पाणी; गटारीचे काम लवकर करण्याची नागरिकांची मागणी
Crime news | ज्येष्ठाला जिवे मारण्याचा प्रयत्न; सावकाराची येरवडा कारागृहात रवानगी
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला निर्धार सभेत तपास यंत्रणेचा निषेध