अभिनेत्रीच्या अपघाती मृत्यूचा धक्का: अभिनेता चंद्रकांतने जीवन संपविले
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : चंदू या नावाने प्रसिद्ध असलेला तेलुगू टेलिव्हिजन अभिनेता चंद्रकांत याने तेलंगणातील अलकापूर येथील राहत्या घरी आपले जीवन संपविले. त्याच्या मृत्यूच्या बातमीमुळे तेलुगू टेलिव्हिजन इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी चंदू याची सहकलाकार आणि जवळची मैत्रीण पवित्रा जयराम हिचा एका रस्ता अपघातात मृत्यू झाला होता.
अभिनेता चंद्रकांत याने जीवन का संपविले?
मैत्रीण पवित्रा जयराम हिचा एका रस्ता अपघातात मृत्यू झाला होता.
पवित्राच्या अपघाती मृत्यूचा त्याला धक्का बसला होता.
चंदू मागील काही दिवसांपासून नैराश्यात होता.
इंस्टाग्रामवर त्याने भावनिक श्रद्धांजली लिहिली होती.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, चंद्रकांतच्या वडिलांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यांनी सांगितले की, चंदू मागील काही दिवसांपासून नैराश्यात होता. पवित्राच्या अपघाती मृत्यूचा त्याला धक्का बसला होता. त्याने आपल्या सहकलाकारासाठी इंस्टाग्रामवर भावनिक श्रद्धांजली लिहिली होती. त्याची ही शेवटची पोस्ट होती.
दरम्यान, चंदू आणि पवित्रा रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. एका पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे की, @pavithrajayaram_chandar. माझी पावी आता राहिली नाही, प्लीज रे परत ये plsss.”
तेलगू आणि कन्नड टीव्ही मालिकांमध्ये अभिनेत्री म्हणून काम करणारी पवित्रा जयराम हिचे आंध्र प्रदेशातील महबूबनगरजवळ भीषण कार अपघात मृत्यू झाला होता. हैदराबादहून वानापर्थीला येणारी बस कारच्या उजव्या बाजूला धडकून हा अपघात झाला होता. कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील हनाकेरे येथे परतत असताना ही घटना घडली होती. तिच्या मृत्यूमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला.
तेलुगू टेलिव्हिजनवरील मालिका ‘त्रिनयणी’मध्ये तिलोत्तमाच्या भूमिकेमुळे पवित्रा लोकप्रिय झाली. याशिवाय तिने अनेक टीव्ही शो देखील केले आहेत. ती इंस्टाग्रामवर देखील सक्रिय होती.
Telugu actor Chandrakanth dies by suicide days after co-star Pavithra Jayaram lost life in car accident
Read @ANI Story | https://t.co/rAG4GALsXm#Chandrakkanth #PavithraJayaram #Telugu pic.twitter.com/6v4Q1gjzfr
— ANI Digital (@ani_digital) May 18, 2024
हेही वाचा
Swati Maliwal assault case| मोठी बातमी: स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण: बिभव कुमार यांना दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात
Sukma Encounter | छत्तीसगडच्या सुकमात चकमक, एक नक्षली ठार
Global Extinction Species Day Special | ’डोडो’ पक्षी आता उरला फक्त चित्रात!