मोठी बातमी: स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणी बिभव कुमार पोलिसांच्या ताब्यात

पुढारी ऑनलाईन डेस्क: आप खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणी प्रकरणात बिभव कुमार यांना दिल्ली पोलिसांनी आज (दि.१८ मे) ताब्यात घेतले आहे. ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पर्सनल सेक्रेटरी (Swati Maliwal assault case) आहेत. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणातील ठळक मुद्दे स्वाती मालीवाल यांचा अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहायक …

मोठी बातमी: स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणी बिभव कुमार पोलिसांच्या ताब्यात

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: आप खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणी प्रकरणात बिभव कुमार यांना दिल्ली पोलिसांनी आज (दि.१८ मे) ताब्यात घेतले आहे. ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पर्सनल सेक्रेटरी (Swati Maliwal assault case) आहेत. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.
स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणातील ठळक मुद्दे

स्वाती मालीवाल यांचा अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहायक विभवकुमार यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
दिल्लीचे मुखमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर देखील नाव न घेता आरोप
पोलिसांनी मालीवाल यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री सदनात १३ मे रोजी घडलेल्या घटनेचे दृश्य पुन्हा तयार केले.
त्यानंतर दिल्ली पोलिसांनी आज (दि.१८) अरविंद केजरीवाल यांचे पर्सनल सेक्रेटरी बिभव कुमार यांना ताब्यात घेतले आहे. 

Former PS of Delhi CM Arvind Kejriwal, Bibhav Kumar has been detained by Delhi Police in connection with the AAP MP Swati Maliwal assault case pic.twitter.com/RrukV9GYJ2
— ANI (@ANI) May 18, 2024

सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेमकं काय आहे?
‘आप’ने व्हायरल केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मालीवाल या मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सदनातून बाहेर पडताना दिसत आहेत. त्यांना महिला सुरक्षा रक्षकांने पकडले आहे. फुटेजमध्ये मालीवाल या परिसराबाहेर सुरक्षा कर्मचाऱ्यांशी वाद घालत असल्याचेही दिसते. मालीवाल रस्त्यावर येताच त्या महिला सुरक्षा कर्मचाऱ्याचे हात झटकतात. यादरम्यान तेथे दोन पोलिसही दिसतात. त्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे बोट दाखवत त्यांना काहीतरी बोलतात. मालीवाल यांनी मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये बदल केल्याचा आरोप (Swati Maliwal assault case) केला आहे.
विभव कुमार यांनी माझा शर्ट वर खेचला; मालीवाल यांची तक्रार
स्वाती मालीवाल यांनी विभव कुमार (Swati Maliwal assault case) यांनी मारहाण केल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. “मी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी वाट पाहत असताना अचानक विभव कुमार तिथे आले. त्यांनी कोणतीही चर्चा न करता शिवीगाळ करण्यास सुरवात केली. शिवीगाळ केल्यानंतर ते थांबले नाहीत. त्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. जाणीवपूर्वक त्यांनी माझा शर्ट वर खेचला. एवढे सगळे होत असतानाही माझ्या मदतीला कोणीही आले नाही, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
मालीवाल यांच्याकडूनच धमक्या, आपचा आरोप
स्वाती मालीवाल यांना अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहायक विभवकुमार यांनी मारहाण केल्याचे आरोप खोटे असून, हा भाजपचा कट असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने एका व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून केला आहे. दिल्ली सरकारच्या मंत्री आणि आपच्या नेत्या आतिशी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन हा खुलासा केला. त्या म्हणाल्या की, स्वाती मालीवाल यांनी तक्रारीमध्ये विभव कुमार यांच्यावर केलेले गंभीर आरोप निखालस खोटे आहेत. केजरीवाल तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांना घेरण्यासाठी भाजपचा हा कट आहे. आज एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये मालीवाल ड्रॉईंग रूममध्ये आरामात बसलेल्या दिसत आहेत. सुरक्षा कर्मचाऱ्यांना धमकावत असून, विभव कुमारला शिवीगाळ करत आहेत. त्याच्या अंगावर कोणतीही जखम दिसत नाही. त्यामुळे त्यांनी केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत.
हेही वाचा: 

Swati Maliwal: मारहाण प्रकरणात स्वाती मालीवाल यांचा केजरीवाल-विभव कुमारांवर हल्लाबोल

Swati Maliwal: माझ्याबद्दल खोटे बोलून मला घाबरवलं जातय, जिवंत असेपर्यंत लढत राहीन- स्वाती मालीवाल

केजरीवाल गप्प का? स्वाती मालीवाल प्रकरणी निर्मला सीतारामन यांचा सवाल