मराठी, हिंदी ते मल्याळमपर्यंतचा प्रवास; सोनाली कुलकर्णी अशी घडली

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मराठी, बॉलिवूडमध्ये आपले अभिनयकौशल्य दाखवल्यानंतर आता सोनाली दाक्षिणात्य चित्रपटातून आपली अदाकारी दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. तिने मराठी चित्रपटांसोबत हिंदी चित्रपटात भूमिका साकारल्या. ज्या आजही लक्षात राहण्यासारख्या आहेत. मल्टी-स्टारर चित्रपट ग्रँड मस्ती मधून तिने हिंदी चित्रपट विश्वात डेब्यू केला होता. तसेच सिंघम रिटर्न्स मध्येही तिची संक्षिप्त भूमिका होती. आज …

मराठी, हिंदी ते मल्याळमपर्यंतचा प्रवास; सोनाली कुलकर्णी अशी घडली

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मराठी, बॉलिवूडमध्ये आपले अभिनयकौशल्य दाखवल्यानंतर आता सोनाली दाक्षिणात्य चित्रपटातून आपली अदाकारी दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. तिने मराठी चित्रपटांसोबत हिंदी चित्रपटात भूमिका साकारल्या. ज्या आजही लक्षात राहण्यासारख्या आहेत. मल्टी-स्टारर चित्रपट ग्रँड मस्ती मधून तिने हिंदी चित्रपट विश्वात डेब्यू केला होता. तसेच सिंघम रिटर्न्स मध्येही तिची संक्षिप्त भूमिका होती. आज १८ मे रोजी तिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया सोनालीने मराठी, हिंदी ते दाक्षिणात्य चित्रपटापर्यंत कशी मजल मारली?

सोनालीला या मराठी चित्रपटातून मिळाली प्रचंड लोकप्रियता

क्षणभर विश्रांती , अजिंठा , झपाटलेला २, मितवा, गाढवाचं लग्न, गोष्ट लग्नानंतरची
इरादा पक्का, क्लासमेट्स, पोश्टर गर्ल, धुरळा, पांडू, झिम्मा, हिरकणी
विक्की वेलिंगकर, विक्टोरिया, तिथि भेट, तमाशा लाईव्ह, बघतोस काय मुजरा कर, हंपी

सोनालीचे शिक्षण झालंय तरी किती?
सोनाली कुलकर्णीचा जन्म १८ मे, १९८८ रोजी पुण्यात झाला. तिचे वडील मनोहर कुलकर्णी एक सेवानिवृत्त लष्करी डॉक्टर आहेत. तिने आर्मी स्कूल, केंद्रीय विद्यालयातून शिक्षण घेतलं. पुढे पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज मधून मास कम्युनिकेशन आणि पत्रकारितेत शिक्षण घेतलं.

चित्रपट नटरंगमधून अमाप लोकप्रियता
सोनालीने मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. तिला दोन फिल्मफेअर मराठी पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मराठी चित्रपट नटरंगमध्ये लावणी नृत्य “अप्सरा आली”मुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. कॉलेजमध्ये अशताना तिने मॉडेलिंग म्हणून काम केले. पुढे केदार शिंदे यांच्या बकुळा नामदेव घोटाळेमधून तिने सिने करिअरची सुरुवात केली.

दाक्षिणात्य इंडस्ट्रीतही दबदबा
लिजो जोस पल्लीसरी दिग्दर्शित ‘मलाइकोट्टाई वालिबान’ या चित्रपटातून सोनाली मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यात सोनाली सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली.

 

View this post on Instagram

 
A post shared by Saregama Malayalam (@saregamamalayalam)

 
हेदेखील वाचा-

ज्यु. एनटीआरचा ‘देवरा’मध्ये नवा स्वॅग, Fear Song प्रोमो आऊट
तारक मेहता फेम ‘सोढी’ गुरुचरण सिंग २५ दिवसांनंतर घरी परतले
क्रिमिनल जस्टीस ४ ची घोषणा, पंकज त्रिपाठी येतोय सर्वांची बोलती बंद करायला