संतापलेल्‍या मुलाकडून वडिलांची दहावीची मार्कशीट व्हायरल; अन्…

पुढारी ऑनलाईन ; आपल्‍या वडिलांवर रागावलेल्‍या मुलाने वडिलांचीच १० वीची मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल केली. मार्कशीट चा फोटो शेयर करत त्‍याने म्‍हटलंय की, त्‍याचे वडिल त्‍याला खूप म्‍हणायचे पास होऊन दाखव… पास होऊन दाखव… मात्र आता त्‍यांचीच मार्कशीट माझ्या हाती लागली आहे. सोशल मीडियाच्या काळात कोणाचीही गुपिते लपवता येत नाहीत. असच काहीस एका मुलाने आपल्‍या …

संतापलेल्‍या मुलाकडून वडिलांची दहावीची मार्कशीट व्हायरल; अन्…

Bharat Live News Media ऑनलाईन ; आपल्‍या वडिलांवर रागावलेल्‍या मुलाने वडिलांचीच १० वीची मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल केली. मार्कशीट चा फोटो शेयर करत त्‍याने म्‍हटलंय की, त्‍याचे वडिल त्‍याला खूप म्‍हणायचे पास होऊन दाखव… पास होऊन दाखव… मात्र आता त्‍यांचीच मार्कशीट माझ्या हाती लागली आहे.
सोशल मीडियाच्या काळात कोणाचीही गुपिते लपवता येत नाहीत. असच काहीस एका मुलाने आपल्‍या वडिलांसोबत केलं. या मुलाने सोशल मीडियावर आपल्‍या वडिलांची पोल-खोल केली. त्‍याने आपल्‍या वडिलांची दहावीची मार्कशीट व्हायरल केली. अन् कॅप्शन लिहिले की, वडिलांची मार्कशीट मला मिळाली.
“मित्रांनो, पप्पांची मार्कशीट बघूया.”
त्‍यात, हा मुलगा व्हिडिओमध्ये बोलताना म्‍हणतोय की, माझे वडिल माझ्यावर खूप ओरडतात. ते वारंवार मला म्‍हणायचे की, पास होऊन दाखव, पास होऊन दाखव, आणि हे बघा १० वी मध्ये जितके विषय होते त्‍या सर्व विषयात हे स्‍वत: हा नापास झाले आहेत. हे त्‍यांचे मार्कशीट आहे पहा…मुलाचा हा व्हिडिओ पाहून लोकांना हसू आवरणे कठीण जात आहे. आणि ए मीमही त्‍याने शेअर केला आहे ज्‍यात ६० टक्‍के गुण मिळवूनही बेल्‍टने मार खावा लागला आणि वडिल स्‍वत:हा मात्र १० वी मध्ये फेल झाले होते.
पोस्टवर कमेंट करून लोकांनी त्या मुलाला दिले उपदेशाचे डोस
हे मार्कशीट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @desi_bhayo88 नावाच्या अकाऊंटसह शेअर करण्यात आले आहे. ज्‍याला आतापर्यंत ५ लाख लोकांनी पाहिला आहे तर ५ हजार लोकांनी लाईक केले आहे. एका युजरने लिहिलंय की, वडिलांच्या फेल मार्कशीट मधील मार्क हे आजच्या जमान्यातल CBSC बोर्डाच्या ९० टक्‍केच्या बरोबर हाेते. दुसऱ्याने लिहिलंय की, त्‍यामुळे ते म्‍हणत होते की, पास हो कारण पुढे भविष्‍यात तुझा मुलगा अशाप्रकारे तुझा व्हिडिओ बनवू नये. तर आणखी एका यूजरने लिहिलंय की, तरी ते म्‍हणतात पास होउन दाखव, कारण फेल होण काय असतं ते त्‍यांना चांगलं माहिती आहे.
हेही वाचा : 

Lok Sabha Election 2024 | प्रचाराचा फ्रायडे ठरला ‘ब्लॉकबस्टर’, बड्या नेत्यांनी गाजविले मैदान

Stock Market Special trading session | BSE आणि NSE वर आज स्पेशल ट्रेडिंग, जाणून घ्या वेळ

‘विधी’च्या विद्यार्थ्यांना कायदे निर्मितीचे धडे; थेट मंत्रालयात इंटर्नशिप करण्याची संधी

Go to Source