अखेरच्या टप्प्यात भुजबळांची मनधरणी करण्याचे सर्व स्तरातून प्रयत्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी छगन भुजबळ नाराज असल्याचे सांगितल्यानंतर भाजपचे संकटमोचक अशी ओळख असलेल्या गिरीश महाजनांनी तत्काळ भुजबळ फार्म गाठत छगन भुजबळ यांची भेट घेत तब्बल दोन तास बंद दाराआड चर्चा केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अखेरच्या दिवसापर्यंत भुजबळांची मनधरणी करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. लोकसभेच्या मतदानाचा …

अखेरच्या टप्प्यात भुजबळांची मनधरणी करण्याचे सर्व स्तरातून प्रयत्न

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा – राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी छगन भुजबळ नाराज असल्याचे सांगितल्यानंतर भाजपचे संकटमोचक अशी ओळख असलेल्या गिरीश महाजनांनी तत्काळ भुजबळ फार्म गाठत छगन भुजबळ यांची भेट घेत तब्बल दोन तास बंद दाराआड चर्चा केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अखेरच्या दिवसापर्यंत भुजबळांची मनधरणी करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत.
लोकसभेच्या मतदानाचा दिवस जवळ येऊ लागल्याने प्रचारात आता रंगत वाढत आहे. त्यामुळे भेटीगाठी, मतदारांचे मोठे पॅकेट असलेल्या नेत्यांच्या पायघड्या उमेदवारांच्या वतीने घालण्यात येत आहेत. जिल्ह्यातील नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्याबाबत आधीच नाराजी होती. मात्र तरीदेखील त्यांचे नाव जाहीर करण्यात आले होते.
मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी नाव जाहीर केल्याने नाशिकच्या महायुतीमध्ये धुसफुस वाढली होती. भुजबळांनी, कोणालाही न विचारता नाव जाहीर करणारे श्रीकांत शिंदे कोण? असा जाहीर प्रश्न विचारला, तर भाजपने १०० नगरसेवक, तीन आमदारांची ताकद असल्याने आपल्याला विचारात न घेता कसे काय नाव जाहीर केले, यासाठी आंदोलन केले होते. अचानक भाजपच्या दिल्लीतील श्रेष्टींनी ओबीसी कार्ड चालवत नाशिक लोकसभा मतदारसंघातून भुजब‌ळांचे नाव निश्चित करत राज्याच्या नेतृत्वाकडे जबाबदारी दिली होती. मात्र, महिना उलटून गेला, तरी भुजबळांचे नाव जाहीर करण्यात आले नव्हते. होणारा विलंब आणि प्रतिस्पर्धी उमेदवाराची प्रचारयात्रा पुढे चालली असल्याने भुजबळांनी निवडणुकीतून जाहीरपणे माघार घेत, आता माझा अडथळा असेल, तर मी माघार घेतो. आता तरी उमेदवार द्या असे सांगितले. तरी देखील 10 दिवस उलटल्यानंतर विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचेच नाव निश्चित करण्यात आले.
अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसाच्या एक दिवसाआधी गोडसे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अर्ज भरला. अर्ज भरल्याच्या दिवशीच भुजबळ समर्थकांनी आता पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली असे संदेश समाजमाध्यमांवर पसरविले. यातून भुजबळ वरवर जरी महायुतीमध्ये असले, तरीदेखील त्यांचा ओढा हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडे असल्याचे चित्र यामधून दिसून आले होते.
यांनी देखील घेतली भुजबळांची भेट
लोकसभा निवडणुक २०२४ च्या पार्श्वभूमीवर भाजपच्या अनेक नेत्यांनी भुजबळांची मनधरणी करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामध्ये नाशिक लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे, शांतिगिरी महाराज, दिंडोरीच्या उमेदवार डॉ. भारती पवार, धुळ्याचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, धनगर समाजाचे नेते आ. गोपीचंद पडळकर, भाजपचे ज्येष्ठ नेते श्रीकांत भारतीय, संकटमोचक ओळख असलेले गिरीश महाजन तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा समावेश आहे.
हेही वाचा:

Lok Sabha Election 2024 | मतदानवाढीसाठी प्रयत्न करावे : जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे आवाहन
Mahadev Betting App Case | ऑनलाइन सट्टेबाजीसाठी 452 बँक खात्यांचा वापर
Lok Sabha Election 2024 | मविआच्या कार्यकर्त्यांना लक्ष्मीदर्शनाला आळा घालण्याचे प्रशिक्षण