Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ‘देवरा’च्या ‘फियर सॉन्ग’मध्ये ज्युनियर एनटीआरचा नवा स्वॅग दिसलाय. सोशल मीडियावर हे गाणे पाहायला मिळत आहे. या गाण्याचे फिअर सॉन्ग प्रोमो रिलीज झाले असून तेलुगू सुपरस्टार ज्युनियर एनटीआरने त्याच्या आगामी ॲक्शन फिल्म ‘देवरा: पार्ट’च्या बहुप्रतीक्षित पहिल्या सिंगलचा टीझर रिलीज केला आहे. त्याचे नाव ‘फियर सॉन्ग’ आहे. हे गाणे अनिरुद्ध रविचंदरने गायले आहे. RRR स्टारच्या ४१ व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला हा दमदार ट्रॅक १९ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
ज्युनियर NTR २० मे रोजी त्यांचा ४१ वा वाढदिवस साजरा करणार आहे. त्याच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला, निर्मात्यांनी १९ मे रोजी एक फियर सॉन्ग रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्युनियर एनटीआरने स्वत: गाण्यातील एक प्रोमो शेअर केला आहे. याशिवाय झलकमध्ये अनिरुद्ध रविचंदर एक गाणे गातानाही दाखवण्यात आले आहे.
देवराविषयीच्या या गोष्टी जाणून घ्या
कोरटाला शिवा दिग्दर्शित ‘देवरा’ दोन भागात प्रदर्शित होणार आहे
‘देवरा : पार्ट १’ नावाचा पहिला भाग १० ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे
प्रकाश राज, श्रीकांत, शाइन टॉम चाको, नारायण आणि कलाईरासन हे सहाय्यक भूमिकेत आहेत
सैफ भैराच्या भूमिकेत तर जान्हवी थंगमच्या भूमिकेत दिसेल
इन्स्टाग्रामवर टीझर शेअर करताना एनटीआरने लिहिले, ‘१९ मे ला हे गाणे रिलीज होणार आहे….देवरा.’ १४ सेकंदाच्या प्रोमोमध्ये ज्युनियर एनटीआर देवराच्या भूमिकेत आहे, जो समुद्रात आपल्या सैन्यासह दिसत आहे. प्रोमोमध्ये रॉकस्टार अनिरुद्धची झलकही दाखवण्यात आली आहे. या क्लिपचा शेवट देवरा या अंधाऱ्या रात्री समुद्रकिनारी उभा राहून होतो. यापूर्वी, एनटीआरचे रक्ताने माखलेले हात असलेले एक नवीन पोस्टर समोर आले होते.
View this post on Instagram
A post shared by Jr NTR (@jrntr)