किर्गिझस्तान हिंसाचार; भारतीय विद्यार्थ्यांसाठी अ‍ॅडव्हायजरी जारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : किर्गिस्तानची राजधानी बिश्केकमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जात आहे. जमावाकडून हिंसाचाराच्या घटना घडवल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर किर्गिझस्तानमधील (Kyrgyz Republic) भारतीय विद्यार्थ्यांसाठी अ‍ॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. किर्गिस्तानमधील हिंसाचार घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. यामध्ये भारत आणि पाकिस्तानने शनिवारी बिश्केकमधील विद्यार्थ्यांना “घरातच …

किर्गिझस्तान हिंसाचार; भारतीय विद्यार्थ्यांसाठी अ‍ॅडव्हायजरी जारी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : किर्गिस्तानची राजधानी बिश्केकमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जात आहे. जमावाकडून हिंसाचाराच्या घटना घडवल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर किर्गिझस्तानमधील (Kyrgyz Republic) भारतीय विद्यार्थ्यांसाठी अ‍ॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.
किर्गिस्तानमधील हिंसाचार घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. यामध्ये भारत आणि पाकिस्तानने शनिवारी बिश्केकमधील विद्यार्थ्यांना “घरातच राहण्याचा” सल्ला दिला. “सध्या परिस्थिती शांत आहे”, तरी बिश्केकमधील वैद्यकीय विद्यापीठांच्या काही वसतिगृहांवर, जिथे भारत, बांगलादेश आणि पाकिस्तानचे विद्यार्थी राहतात, हिंसाचाराच्या दरम्यान हल्ले झाले आहेत, असे देखील पाकिस्तानच्या (Kyrgyz Republic) मिशनने सांगितले आहे.

Embassy of India in Kyrgyz Republic tweets, “We are in touch with our students. The situation is presently calm but students are advised to stay indoors for the moment and get in touch with the Embassy in case of any issue…” pic.twitter.com/iVOZrblrKo
— ANI (@ANI) May 18, 2024

“आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहोत. सध्या परिस्थिती शांत आहे, परंतु विद्यार्थ्यांना तात्काळ घरात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि कोणतीही समस्या उद्भवल्यास दूतावासाशी संपर्क साधा. आमचा 24-7 संपर्क क्रमांक 0555710041 आहे,” भारतीय बिश्केकमधील मिशनने ट्विट केले.

Monitoring the welfare of Indian students in Bishkek. Situation is reportedly calm now. Strongly advise students to stay in regular touch with the Embassy. https://t.co/xjwjFotfeR
— Dr. S. Jaishankar (Modi Ka Parivar) (@DrSJaishankar) May 18, 2024

हे ही वाचा:

Arjun Tendulkar : विकेट नाही, पूरणने षटकार ठोकले, अर्जुन तेंडुलकरने अर्ध्यातच मैदान सोडले
‘आपत्कालीन स्थितीसाठी यंत्रणा सज्ज ठेवा’; विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या सूचना