कोलकात्याची लिची पुण्याच्या बाजारात; हंगाम सुरू झाल्याने आवक वाढली

पुणे : पुढारी वृत्तसेवा : रंगाने लाल चुटूक, काटेरी आणि चवीला गोड असणार्‍या लिची या फळाचा हंगाम सुरू झाल्याने बाजारात लिचीची फळे लक्ष वेधून घेत आहेत. ग्राहकांकडून लिची या फळाला मोठी मागणी असल्याने त्याचे भाव तेजीत आहेत. घाऊक बाजारात एक किलो लिचीचे दर 220 ते 270 रुपये असून, किरकोळ बाजारात 300 ते 350 रुपये किलो …

कोलकात्याची लिची पुण्याच्या बाजारात; हंगाम सुरू झाल्याने आवक वाढली

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : रंगाने लाल चुटूक, काटेरी आणि चवीला गोड असणार्‍या लिची या फळाचा हंगाम सुरू झाल्याने बाजारात लिचीची फळे लक्ष वेधून घेत आहेत. ग्राहकांकडून लिची या फळाला मोठी मागणी असल्याने त्याचे भाव तेजीत आहेत. घाऊक बाजारात एक किलो लिचीचे दर 220 ते 270 रुपये असून, किरकोळ बाजारात 300 ते 350 रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. हंगामाची सुरुवात असल्याने कोलकाता परिसरातून लिची बाजारात दाखल होत आहे. सद्यस्थितीत गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात दररोज तीनशे ते चारशे पेट्यांची आवक होत आहे. दहा किलो स्वरूपात दाखल होणार्‍या लिचीला 2200 ते 2700 रुपये दर मिळत आहेत. मागील वर्षी दहा किलो लिचीला दोन हजार ते 2400 रुपये दर मिळाले होते. यंदाच्या लिचीच्या दरात वाढ झाली असल्याची माहिती मार्केट यार्डातील लिचीचे व्यापारी राजेश परदेशी यांनी दिली.
कोलकाता, बिहार, पंजाबमधून होते आवक
हंगामाच्या पहिल्या टप्प्यात कोलकातामधून लिचीची आवक सुरू होते. त्यानंतर, 21 मे दरम्यान बिहारमधून लिची बाजारात दाखल होण्यास सुरुवात होते. तर हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात पंजाबमधील पठाणकोट परिसरातून लिचीची आवक होते. लिचीचा हंगाम साधारणपणे 15 जुलैपर्यंत सुरू राहतो. पावसाळा सुरू झाल्यानंतर लिचीचा हंगाम संपतो.
हवाई वाहतुकीमुळे दर तेजीत
उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वेला गर्दी आहे. रेल्वे गाड्या विलंबाने पोहोचत असल्याने लिचीच्या प्रतवारीवर परिणाम होतो. कोलकात्यातून विमानाने लिचीची आवक होत असून, वाहतूक खर्चामुळे लिचीचे दर तेजीत आहेत. लिचीला मागणी चांगली आहे. सोलापूर, नगर, हुबळी, धारवाड येथील फळबाजारात पुण्यातून लिची विक्रीस पाठविली जात आहे
हेही वाचा

सकाळी कारवाई; संध्याकाळी हातगाड्या पुन्हा त्याच जागेवर..!
पुढील दहा वर्षांमध्ये मंगळावर जाणार माणूस!
खास थेरपी बनवून स्वतःला केले कर्करोगमुक्त