पालिकेच्या दारातील होर्डिंग काढले; रात्रीत उभारलेल्या होर्डिंगवर सकाळीच कारवाई

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या नवीन इमारतीच्या दारात गुरुवारी रात्री उभारलेले होर्डिंग महापालिका प्रशासनाने शुक्रवारी (दि. 17) सकाळी काढले. पीएमपीएमएल बसस्थानक आणि नागरिकांची गर्दी असलेल्या ठिकाणी झाडांच्या मोठ्या फांद्या तोडून महापालिकेने नियमबाह्य परवानगी दिलीच कशी, असा प्रश्न उपस्थित करत झालेल्या टीकेनंतर प्रशासनाला शहाणपण सुचले आणि हे होर्डिंग काही तासांतच काढण्यात आले. मुंबईतील घाटकोपर येथे …

पालिकेच्या दारातील होर्डिंग काढले; रात्रीत उभारलेल्या होर्डिंगवर सकाळीच कारवाई

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : महापालिकेच्या नवीन इमारतीच्या दारात गुरुवारी रात्री उभारलेले होर्डिंग महापालिका प्रशासनाने शुक्रवारी (दि. 17) सकाळी काढले. पीएमपीएमएल बसस्थानक आणि नागरिकांची गर्दी असलेल्या ठिकाणी झाडांच्या मोठ्या फांद्या तोडून महापालिकेने नियमबाह्य परवानगी दिलीच कशी, असा प्रश्न उपस्थित करत झालेल्या टीकेनंतर प्रशासनाला शहाणपण सुचले आणि हे होर्डिंग काही तासांतच काढण्यात आले. मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून 14 जणांना जीव गमवावा लागला तसेच अनेक जण जखमी झाले. या घटनेनंतर राज्यातील होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला. यापूर्वी पुण्यात व पिंपरी-चिंचवड परिसरात होर्डिंग कोसळून अनेकांचा जीव गेला.
दुर्घटना घडल्यानंतर तेवढ्यापुरती कारवाई मोहीम हाती घेतली जाते. काही दिवसांनी सर्व परिस्थिती ’जैसे थे’ होते. आता घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर महापालिकेने शहरातील अधिकृत मात्र धोकादायक व अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. असे असताना महापालिकेच्या नवीन इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ नवीन होर्डिंग उभारण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी होर्डिंगसाठी एक मोठा गर्डर उभारण्यात आला होता. या संदर्भात माहिती घेतल्यानंतर महापालिकेने येथील होर्डिंगला दोन महिन्यांपूर्वी परवानगी दिल्याचे समोर आले.
एकीकडे रहदारीच्या ठिकाणी उभ्या असलेल्या अधिकृत व अनधिकृत होर्डिंगवर कारवाई सुरू असताना महापालिकेने पीएमपीएमएल बस स्थानकाच्या आणि महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ कशी परवानगी दिली, असा प्रश्न उपस्थित करत ’दैनिक Bharat Live News Media’ने शुक्रवारी याबाबत वृत्त प्रसिद्ध केले. दरम्यान, संबंधित ठेकेदाराने गुरुवारी एका रात्रीत होर्डिंगचा संपूर्ण सांगाडा उभा केला होता. महापालिकेच्या या कारभारावर टीकेची झोड उठताच महापालिकेने शुक्रवारी हे होर्डिंग हटवले.
पीएमपीएमएल प्रशासनाने आठ ठिकाणी होर्डिंग उभे करण्यास जनरल परवानगी घेतली होती. संबंधित ठेकेदाराने महापालिका भवनाच्या प्रवेशद्वारासमोरच होर्डिंग उभे केल्याचे आणि होर्डिंगसंदर्भातील अनेक नियमांचे उल्लंघन केल्याने येथील होर्डिंगचा परवाना रद्द केला आहे. हे होर्डिंग महापालिकेने काढल्याने संबंधित ठेकेदाराला पन्नास हजार रुपये दंड करण्यात येणार आहे.
– माधव जगताप, उपायुक्त, आकाशचिन्ह व परवाना विभाग, महापालिका

हेही वाचा

पित्ताशयात खडे कशामुळे होतात? जाणून घ्या अधिक
खास थेरपी बनवून स्वतःला केले कर्करोगमुक्त
प्रसिद्धीसाठी केला ‘डिझेल पराठा’, मागावी लागली माफी!