इमारतींच्या टेरेसवर होर्डिंग नकोच! कारवाई करण्याची नागरिकांची मागणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : रस्त्याच्या कडेला असणार्‍या इमारतींच्या टेरेसवर धोकादायक पद्धतीने उभे असलेले होर्डिंग नकोच. टेरेसवरील अधिकृत आणि अनधिकृत अशा सर्वच होर्डिंगवर कारवाई करून ते काढावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. महापालिकेच्या हद्दीत आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून शहरात होर्डिंग उभारण्यासाठी सशुल्क परवानगी दिली जाते. होर्डिंग उभारण्यासंदर्भात शासनाने तयार केलेल्या नियमावलीचे पालन करणे हे …

इमारतींच्या टेरेसवर होर्डिंग नकोच! कारवाई करण्याची नागरिकांची मागणी

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : रस्त्याच्या कडेला असणार्‍या इमारतींच्या टेरेसवर धोकादायक पद्धतीने उभे असलेले होर्डिंग नकोच. टेरेसवरील अधिकृत आणि अनधिकृत अशा सर्वच होर्डिंगवर कारवाई करून ते काढावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. महापालिकेच्या हद्दीत आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून शहरात होर्डिंग उभारण्यासाठी सशुल्क परवानगी दिली जाते.
होर्डिंग उभारण्यासंदर्भात शासनाने तयार केलेल्या नियमावलीचे पालन करणे हे परवानाधारक होर्डिंगधारकांना बंधनकारक असते. या माध्यमातून महापालिकेला उत्पन्नही मिळते.
मात्र, महापालिकेची परवानगी न घेताच अनधिकृतपणे होर्डिंग उभारले जातात. यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे महापालिकेकडून अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करून ते जमीनदोस्त केले जाते. तसेच होर्डिंगमालकाला 50 हजार रुपये दंड केला जातो. मात्र, अनेकदा राजकीय वरदहस्त आणि अधिकार्‍यांशी साटेलोटे, यामुळे अनधिकृत होर्डिंगवर करवाई होत नाही.दरम्यान, महापालिकेने शहरातील इमारतींच्या टेरेसवरील होर्डिंगला मोठ्या प्रमाणात परवानग्या दिल्याने जिकडे-तिकडे इमारतींच्या टेरेसवर याचे प्रमाण वाढले आहे. तीस वर्षांपेक्षा जुन्या आणि कमकुवत बांधकाम झालेल्या इमारतींच्या टेरेसवरील होर्डिंग वार्‍यामुळे कोसळण्याची व दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त करीत नागरिकांनी टेरेसवरील होर्डिंग नको, टेरेसवरील सर्व होर्डिंग हटवावेत, अशी मागणी केली आहे.
नागरिकांनी दैनिक ‘Bharat Live News Media’कडे व्यक्त केल्या भावना
शहरातील पेठांमधील बहुसंख्य इमारती या जुन्या आणि जीर्ण स्वरूपाच्या आहेत. याच इमारतींच्या टेरेसवर आणि भिंतींना होर्डिंग उभारण्यात आले आहेत. वार्‍यामुळे हे होर्डिंग पडून नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे टेरेसवरील आणि भिंतींना लटकणारे होर्डिंग काढण्यात यावेत.
– दिलीप यादव, सदाशिव पेठ
वारंवार होर्डिंग कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. तरीही प्रशासनाकडून होर्डिंगच्या समस्येकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. इमारतींवर उभे असलेले होर्डिंग वार्‍यामुळे पडू शकतात. तसेच, हे होर्डिंग पडल्यानंतर जुन्या इमारतींनाही धोका पोहचू शकतो, त्यामुळे टेरेसवरील होर्डिंग हटवणे गरजेचे आहे.
– कुणाल तिडके, डेक्कन
रस्त्याच्या कडेला असणार्‍या जुन्या इमारतींच्या टेरेसवर मोठे होर्डिंग उभे आहेत. शिवाय इमारतींच्या भिंतींनाही होर्डिंग लटकतात. त्यामुळे इमारतींच्या जवळून जाताना भीती वाटते. त्यामुळे असे होर्डिंग प्रशासनाने काढावेत.
– मधुरा कुलकर्णी, शनिवार पेठ

हेही वाचा

कोल्हापूर : रोज 200 एमएलडी विषाक्त पाणी पंचगंगेत
रन-वेवर विमानाला ट्रॅक्टरची जोरदार धडक..! पुणे विमानतळावरील घटना
पुन्हा मुलींची बाजी!