BSE आणि NSE वर आज स्पेशल ट्रेडिंग, जाणून घ्या वेळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) या दोघांनीही शनिवारी (१८ मे) रोजी विशेष ट्रेडिंग सत्र आयोजित केले आहे. आजच्या विशेष ट्रेडिंग सत्रात प्राथमिक साइट (PR) डिझास्टर रिकव्हरी (DR) साइटवर स्विच केली जात आहे. इक्विटी आणि इक्विटी डेरिव्हेटिव्ह विभागांवर केंद्रित असलेल्या या सत्राचे उद्दिष्ट म्हणजे ट्रेडिंग दरम्यान मोठा व्यत्यय …

BSE आणि NSE वर आज स्पेशल ट्रेडिंग, जाणून घ्या वेळ

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) या दोघांनीही शनिवारी (१८ मे) रोजी विशेष ट्रेडिंग सत्र आयोजित केले आहे. आजच्या विशेष ट्रेडिंग सत्रात प्राथमिक साइट (PR) डिझास्टर रिकव्हरी (DR) साइटवर स्विच केली जात आहे. इक्विटी आणि इक्विटी डेरिव्हेटिव्ह विभागांवर केंद्रित असलेल्या या सत्राचे उद्दिष्ट म्हणजे ट्रेडिंग दरम्यान मोठा व्यत्यय आल्यास एक्सचेंजेसच्या डिझास्टर तयारीचे मूल्यांकन करणे आहे. यापूर्वी, २ मार्च २०२४ रोजी विशेष ट्रेडिंग सत्र आयोजित करण्यात आले होते.
सामान्यपणे शेअर बाजारातील व्यवहार शनिवारी बंद असतात. पण बीएसई आणि एनएसईने शनिवारची शेअर बाजारातील व्यवहारासाठी असलेली सुट्टी रद्द केली आहे. अनपेक्षित डिझास्टर हाताळण्याच्या तयारीची चाचणी घेण्यासाठी हे विशेष थेट ट्रेडिंग सत्र आयोजित केले आहे. आजचे विशेष सत्र दोन सत्रांमध्ये विभागले जाईल जेथे इक्विटी आणि इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये कमी कालावधीसाठी ट्रेडिंग होत आहे.
विशेष ट्रेडिंग सत्राची वेळ
कॅश मार्केटसाठी प्राथमिक सत्र सकाळी ८:४५ ते ९ दरम्यान सकाळच्या ब्लॉक डील विंडोने सुरू झाले. विशेष ट्रेडिंग सत्रात NSE आणि BSE वर प्री-ओपन सत्र सकाळी ९ ते ९.०८ दरम्यान आणि सकाळी ९:१५ ते १० वाजेदरम्यान सामान्य ट्रेडिंग आहे. त्यानंतर ११:१५ पर्यंत ब्रेक असेल.
दुसरे सत्र
तर डिझास्टर रिकव्हरी साइटवर प्री-ओपनिंग सत्र सकाळी ११:१५ ते ११.२३ दरम्यान होईल. त्यानंतर सकाळी ११:३० वाजता सामान्य ट्रेडिंग होईल आणि ते दुपारी १२:३० वाजता बंद होईल. दुपारी १ वाजेपर्यंत पोस्ट-क्लोज ऑर्डर क्लोजिंग आणि मॉडिफिकेशन्स करण्याची परवानगी असेल.
२० मे रोजी शेअर बाजार बंद
दरम्यान, मुंबईत २० मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या दिवशी बीएसई आणि एनएसई दोन्ही सोमवारी २० मे रोजी बंद राहणार आहेत.
हे ही वाचा :

सेन्सेक्स २५३ अंकांनी वाढून बंद, BSE Midcap चा नवा उच्चांक
म्युच्युअल फंड केवायसी नियमात बदल, जाणून घ्या अधिक