हरियाणात पर्यटकांच्या चालत्या बसला आग; ८ जण जिवंत जळाले
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : हरियाणातील नूह येथे पर्यटकांच्या चालत्या बसला आग लागल्याने आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर २४ जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी (दि.१८) रात्री तवाडू उपविभागाच्या सीमेवरून जाणाऱ्या कुंडली मानेसर पलवल महामार्गावर हा अपघात झाला.
VIDEO | At least eight people were killed when the bus they were travelling in caught fire on the Kundli-Manesar-Palwal (KMP) Expressway near Nuh, #Haryana, late on Friday.
(Source: Third Party) pic.twitter.com/xeE7XkhBGD
— Press Trust of India (@PTI_News) May 18, 2024
बसमधून ६० जण प्रवास करत होते. हे पर्यटक मथुरा आणि वृंदावनला भेट देऊन परतत असताना ही दुर्घटना घडली. कुंडली मानेसर पलवल महामार्गावर बसला आग लागली. स्थानिक लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांना माहिती दिली. यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणली. या आगीत ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर २४ जण जखमी झाले. अपघातात बळी पडलेले पंजाब आणि चंदीगडचे रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.
बसमध्ये प्रवास करणाऱ्या सरोज पुंज आणि पूनम यांनी सांगितले की, गेल्या शुक्रवारी त्यांनी पर्यटक बस भाड्याने घेतली होती. बनारस आणि मथुरा वृंदावन दर्शनासाठी सर्वजण निघाले होते. बसमध्ये महिला आणि लहान मुलांसह ६० जण होते. हे सर्वजण जवळचे नातेवाईक होते, जे पंजाबमधील लुधियाना, होशियारपूर आणि चंदीगड येथील रहिवासी होते. शुक्रवारी रात्री दर्शन करून परतत असताना रात्री दीडच्या सुमारास बसला आग लागली.
हेही वाचा :
प. बंगालमध्ये TMC नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक
बिहार : शाळेच्या आवारात विद्यार्थी मृतावस्थेत, कुटुंबीयानी शाळा पेटवली