विकसित भारत बनवणे हेच माझे स्वप्न : पंतप्रधान मोदी

पुढारी ऑनलाईन डेस्क : विकसित भारत बनवणे, हेच माझे स्वप्न असून यासाठी मुंबईची महत्त्वाची भुमिका आहे. भारताबरोबर स्वातंत्र्य मिळालेले अनेक देश आपल्या पुढे गेले, आपण कोठे कमी नव्हतो, मात्र कमी त्या सरकारमध्ये होती. ज्या सरकारने भारतीयांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला नाही, अशी जळजळीत टीका पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (दि. १७) दादरच्या …

विकसित भारत बनवणे हेच माझे स्वप्न : पंतप्रधान मोदी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : विकसित भारत बनवणे, हेच माझे स्वप्न असून यासाठी मुंबईची महत्त्वाची भुमिका आहे. भारताबरोबर स्वातंत्र्य मिळालेले अनेक देश आपल्या पुढे गेले, आपण कोठे कमी नव्हतो, मात्र कमी त्या सरकारमध्ये होती. ज्या सरकारने भारतीयांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला नाही, अशी जळजळीत टीका पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर केली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (दि. १७) दादरच्या शिवाजी पार्कमध्ये महायुतींची सभा सुरू आहे. या सभेवेळी पंतप्रधान मोदी बोलत होते. ‘मुंबईकरांना माझा राम राम’ असं म्हणत त्यांनी मराठीतून आपल्या भाषणाला सुरूवात केली. ‘त्या’ काळातले पंतप्रधान लाल किल्ल्यावरून भारतीयांना आळशी म्हणायचे, ज्या सरकारचे विचार असे असतील, ते देशाला कधीच पुढे जाऊन देणार नाहीत, असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधी यांच्या सल्ल्यानुसार काँग्रेस बरखास्त केली असती तर आज भारत पाच दशक पुढे गेला असता, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पियुश गोयल, नारायण राणे, रामदास आठवले, जोगेंद्र कवाळे, अशिष शेलार, सुनिल तटकरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.