अकोला : वृद्ध कलावंतांना वाढीव मानधनाची प्रतिक्षा

अकोला; पुढारी वृत्तसेवा : समाजकल्याण विभागाकडून वृद्ध कलावंतांच्या कागदपत्रांची सध्या पडताळणी सुरू आहे. यामुळे वृध्द कलावंतांना वाढीव मानधनाची प्रतीक्षा आहे. राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजनेत सुधारणा करून पाच हजार रुपये सरसकट मानधन देण्याचा निर्णय मार्च २०२४ च्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मात्र, अद्याप नव्या निर्णयानुसार अनुदान वितरित झाले नसून वाढीव मानधनाची …

अकोला : वृद्ध कलावंतांना वाढीव मानधनाची प्रतिक्षा

अकोला; Bharat Live News Media वृत्तसेवा : समाजकल्याण विभागाकडून वृद्ध कलावंतांच्या कागदपत्रांची सध्या पडताळणी सुरू आहे. यामुळे वृध्द कलावंतांना वाढीव मानधनाची प्रतीक्षा आहे.
राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजनेत सुधारणा करून पाच हजार रुपये सरसकट मानधन देण्याचा निर्णय मार्च २०२४ च्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मात्र, अद्याप नव्या निर्णयानुसार अनुदान वितरित झाले नसून वाढीव मानधनाची वृद्ध कलावंत व साहित्यिकांना त्याची प्रतीक्षा आहे.
वयोवृद्ध कलावंत-साहित्यिक, लोककलावंत आहेत, त्यांना शासनाने मानधन योजना सुरु केलेली आहे. सध्या या योजनेत अ वर्ग कलावंतास ३१५०, ब वर्ग कलावंतास २७००, क वर्ग कलावंतास २२५० रुपये मानधन देण्यात येते. ग्रामीण भागात लोकनाट्य, पथनाट्य, तमाशा कलावंत, नृत्यकार, जादूगार, भारुड, शाहीर ,वासुदेव, सोंगी भजन, गजर, सुरते, सोंगाडे, वाघ्यामुरळी, गायक, गोंधळी, पोतराज, भजन, नंदीवाले, ढोलपथक, बहुरुपी कलाकार आदी कलावंत अल्प मानधनावर आपली कला सादर करीत आहेत.
नव्याने १४० लाभार्थ्यांना मंजुरी
वृद्ध कलावंत मानधन योजनेचे जिल्ह्यात ६२४ लाभार्थी असून नव्याने १४० लाभार्थ्यांना देखील यंदा मंजुरी मिळाली आहे.