पंतप्रधान मोदींमुळेच राम मंदिर उभे राहिले : राज ठाकरे
ऑनलाईन Bharat Live News Media डेस्क : पंतप्रधान मोदी यांच्यामुळे अयोध्यातील राम मंदिर उभे राहिले अन्यथा ते उभे राहिले नसते. अनेक वर्षापासून ३७० कलम रद्द होऊ शकलं नाही, ते पंतप्रधान मोदींमुळे झालं असे प्रतिपादन मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आज (दि. १७) दादरच्या शिवाजी पार्कमध्ये महायुतींची सभा सुरू आहे. या सभेत राज ठाकरे बोलत होते. देशात सात टप्यात निवडणूका होत असून निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याच्या निमित्त आज महायुतीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे.