बदलत्या आव्हानांसाठी सज्ज होतोय स्वयंसेवक संघ!

नागपूर; राजेंद्र उट्टलवार : आजकाळ काळानुसार जग, देशापुढे आव्हाने बदलत आहेत. योग्यवेळी आव्हानांना प्रतिसाद देण्याची गरज असल्याने अशा विषयांचाही संघ प्रशिक्षण वर्गात समावेश करण्यात आला आहे. या वर्गाची निर्मिती ही संघटित हिंदू समाजाची जागतिक दृष्टी निर्माण करणारी असेल. या वर्गात विद्यार्थ्यांना समाजातील चांगल्या शक्तीशी जोडून आपली शक्ती कशी वाढवायची? याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षणही मिळेल असे प्रतिपादन …

बदलत्या आव्हानांसाठी सज्ज होतोय स्वयंसेवक संघ!

नागपूर; राजेंद्र उट्टलवार : आजकाळ काळानुसार जग, देशापुढे आव्हाने बदलत आहेत. योग्यवेळी आव्हानांना प्रतिसाद देण्याची गरज असल्याने अशा विषयांचाही संघ प्रशिक्षण वर्गात समावेश करण्यात आला आहे. या वर्गाची निर्मिती ही संघटित हिंदू समाजाची जागतिक दृष्टी निर्माण करणारी असेल. या वर्गात विद्यार्थ्यांना समाजातील चांगल्या शक्तीशी जोडून आपली शक्ती कशी वाढवायची? याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षणही मिळेल असे प्रतिपादन अखिल भारतीय सेवा प्रमुख व वर्ग पालक अधिकारी पराग अभ्यंकर यांनी केले.
रेशीम बागेतील स्मृती मंदिर परिसरात आज शुक्रवारीपासून संघाचे तृतीय वर्ष प्रशिक्षण सुरु झाले आहे. एकीकडे देशात लोकसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात असताना संघ मुख्यालयी होत असलेल्या या वर्गाचे बदलते नाव, स्वरूप लक्षवेधी आहे. ९३६ स्वयंसेवक सहभागी झालेल्या वर्गाचा १० जूनला समारोप होईल.
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत तत्पूर्वी या प्रशिक्षणार्थी संघ स्वयंसेवकांचे पथसंचलन होईल. यावेळी प्रथमच या वर्गाचे नाव तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्ग ऐवजी कार्यकर्ता विकास प्रशिक्षण २ असे करण्यात आले आहे. संपूर्ण भारतातून शिकाऊ स्वयंसेवक येथे प्रशिक्षणासाठी येतात, यात डॉक्टर, संशोधक, वकील, व्यावसायिक यांचा समावेश असतो. ज्यामुळे परस्पर राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढते. हिंदुत्वाची एकात्मता येथेही जाणवते, यावर उदघाटन सत्रात वर्ग पालक पराग अभ्यंकर यांच्याकडून भर दिला.
संघ कार्यात प्रशिक्षण वर्गाला खूप महत्त्व आहे. देशभरात जसजसे काम वाढत गेले तसतसे प्रांतीय ठिकाणीही प्रशिक्षण वर्ग होऊ लागले. स्वातंत्र्यापूर्वी अनेक आव्हाने होती. संघाने देशाच्या स्वातंत्र्यासाठीही काम केले. जंगल सत्याग्रहात स्वतः सक्रिय सहभाग घेतला. बंदीचा काळ आणि कोरोनाचा काळ वगळता संघाचे शिक्षण वर्ग कधीच थांबले नाहीत. वेळेनुसार प्रशिक्षण वर्गाचा कालावधी आणि अभ्यासक्रमातही बदल करण्यात आले. कार्यकर्त्याची विचारसरणी काय असावी?, त्याच्यासमोरील आव्हाने काय आहेत?, हे लक्षात घेऊन यंत्रणांमध्येही बदल करण्यात आले. पूर्वीच्या वर्गांमध्ये, शारीरिक कार्यक्रमांतर्गत संयम आणि धैर्य वाढविण्यावर भर दिला जात असे. आता आव्हाने बदलली आहेत, त्याचे संदर्भ समजून घ्यावे लागतील असे आवर्जून यावेळी अभ्यंकर यांनी सांगितले.
भारतमाता पूजन,दीप प्रज्वलन, उदघाटन सत्राला वर्ग नेते इक्बाल सिंग याच्यासह सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल आणि अखिल भारतीय सेवा प्रमुख व वर्ग पालक अधिकारी पराग अभ्यंकर यांनी भारतमातेच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. यावेळी मुकुंदजी व रामदत्त चक्रधर प्रामुख्याने उपस्थित होते.
हेही वाचा 

नांदेड: लालवंडी येथे विषबाधा झालेल्या रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा
Jalgaon News | कापूस बियाणे लागवडीसाठी पुरेसे बियाणे जिल्हयात उपलब्ध, कृषी विभागाची माहिती
Swati Maliwal: मारहाण प्रकरणात स्वाती मालीवाल यांचा केजरीवाल-विभव कुमारांवर हल्लाबोल