क्रिमिनल जस्टीस ४ ची घोषणा, पंकज त्रिपाठी सर्वांची बोलती बंद करणार
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पंकज त्रिपाठीचा ड्रामा सीरीज क्रिमिनल जस्टीस ४ ची घोषणा करण्यात आलीय. माधव मिश्रा बनून सर्वांची बोलती बंद करायला पंकज त्रिपाठी येतोय. आधीचे या सीरीजचे तिन्हीही भाग खूप हिट ठरले आहेत. माधव मिश्रा एक नव्या ट्विस्टसह नवी कहाणी घेऊन येत आहे. ‘क्रिमिनल जस्टिस ४’ च्या नव्या व्हिडिओमध्ये माधव मिश्राचा नवा आणि दबंग अंदाज पाहायला मिळत आहे.
पंकज त्रिपाठीच्या या गोष्टी माहिती आहेत का?
पंकज त्रिपाठीला गँग्स ऑफ वासेपूर (२०१२) मधून ओळख मिळाली
फुकरे, मसान, निल बटे सन्नाटा, बरेली की बर्फी असे चित्रपट त्याला मिळत गेले
फुकरे रिटर्न्स, स्त्री, लूडो, गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल, 83 या चित्रपटांमधून त्याने स्वत:ला सिद्ध केलं
मिर्जापूर, क्रिमिनल जस्टिस यासारख्या चित्रपटांमुळे त्याचे करिअर उंचीवर पोहोचले
क्रिमिनल जस्टिस पहिला व्हिडिओ रिलीज
कोर्टरूम ड्रामा ‘क्रिमिनल जस्टिस’च्या चौथ्या सीझनची पहिली झलक समोर आली आहे. तुम्ही इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ पाहू शकता. यावेळी माधव मिश्रा एक आणखी गुंतागुंतीचा खटला लढताना दिसणार आहे. पंकज त्रिपाठीचे फॅन्स आगामी पार्टचे उत्सुकतेने वाट पाहत आहेत. क्रिमिनल जस्टिसचे शेवटचे ३ सीझन लोकांना इतके आवडले की, प्रेक्षक त्याच्या नवीन सीझनची आतुरतेने वाट पाहत होते. आता डिस्ने प्लस हॉटस्टारने ‘क्रिमिनल जस्टिस ४’ चा पहिला व्हिडिओ शेअर केला आहे.
पंकज त्रिपाठीची माधव मिश्रा ही भूमिका गाजली
‘क्रिमिनल जस्टिस ४’ मधील पंकज त्रिपाठीच्या अभिनयाचे सोशल मीडियावर फॅन्स कौतुक करत आहेत. निर्मात्यांनी क्रिमिनल जस्टिस ४ ची रिलीज डेट शेअर केलेली नाही.
क्रिमिनल जस्टिस ४ विषयी काय म्हटले डिस्ने प्लस हॉटस्टारने
पंकज त्रिपाठी स्टारर हा टीझर शेअर करताना डिस्ने प्लस हॉटस्टारने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘कोर्ट सुरू आहे आणि नवीन सीझनची तयारीही सुरू आहे, माधव मिश्रा हॉटस्टार स्पेशल क्रिमिनल जस्टिसच्या नवीन सीझनसह येत आहे!’ ‘क्रिमिनल जस्टिस’चा पहिला सीझन २०१८ मध्ये, दुसरा २०२० मध्ये आणि तिसरा सीझन २०२२ मध्ये रिलीज झाला होता.
View this post on Instagram
A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)
हेदेखील वाचा –
तारक मेहता फेम दीप्ती साधवानीच्या अदांचा जलवा; कान्समध्ये पडली सगळ्यांवर भारी (Video)
‘भेदभाव का?’ ‘हिरामंडी’साठी मिळालेल्या मानधनावर सोनाक्षी जरा स्पष्टच बोलली
Cannes मध्ये आज स्मिता पाटील यांचा चित्रपट मंथनचे स्क्रिनिंग