मोठी बातमी! बोगद्यातील ४१ कामगार कोणत्याही क्षणी बाहेर

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तराखंड उत्तरकाशीतील सिल्क्यारा बोगद्यात गेल्या १७ दिवसांपासून ४१ कामगार अडकले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी राज्य आणि केंद्रातील सर्व यंत्रणांनी युद्धपातळीवर बचावकार्य केले. दरम्यान उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी बोगद्यात अडकलेल्या कामगारांबाबत मोठी अपडेट दिली आहे. बोगद्यात खोदकामासह पाईप टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, बोगद्यातील ४१  कामगार कोणत्याही क्षणी बाहेर येतील, हा … The post मोठी बातमी! बोगद्यातील ४१ कामगार कोणत्याही क्षणी बाहेर appeared first on पुढारी.
#image_title

मोठी बातमी! बोगद्यातील ४१ कामगार कोणत्याही क्षणी बाहेर

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तराखंड उत्तरकाशीतील सिल्क्यारा बोगद्यात गेल्या १७ दिवसांपासून ४१ कामगार अडकले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी राज्य आणि केंद्रातील सर्व यंत्रणांनी युद्धपातळीवर बचावकार्य केले. दरम्यान उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी बोगद्यात अडकलेल्या कामगारांबाबत मोठी अपडेट दिली आहे. बोगद्यात खोदकामासह पाईप टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, बोगद्यातील ४१  कामगार कोणत्याही क्षणी बाहेर येतील, हा आशेचा किरण आहे, असेही धामी यांनी म्हटले आहे. (Uttarkashi tunnel rescue)
उत्तराखंड मुख्यमंत्री धामी यांनी सोशल मीडिया X वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, बाबा बौख नागजींची अपार कृपा, कोट्यावधी देशवासीयांची प्रार्थना आणि बचाव कार्यात गुंतलेल्या सर्व बचाव दलाच्या अथक परिश्रमामुळे कामगारांना बाहेर काढण्यात यश येत आहे. दरम्यान, कामगारांना बाहेर काढण्यासाठी बोगद्यात पाईप टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच सर्व कामगार बांधवांना बाहेर काढण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. (Uttarkashi tunnel rescue)

बाबा बौख नाग जी की असीम कृपा, करोड़ों देशवासियों की प्रार्थना एवं रेस्क्यू ऑपरेशन में लगे सभी बचाव दलों के अथक परिश्रम के फलस्वरूप श्रमिकों को बाहर निकालने के लिए टनल में पाइप डालने का कार्य पूरा हो चुका है। शीघ्र ही सभी श्रमिक भाइयों को बाहर निकाल लिया जाएगा।
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) November 28, 2023

सायंकाळी ५ पर्यंत ठोस रिजल्ट मिळण्याची आशा-बोगदा तज्ज्ञ
सिल्क्यारा बोगद्यामध्ये अडकलेल्या मजुरांना लवकर बाहेर काढण्याच्या अपेक्षा आता उंचावल्या आहेत. दरम्यान, सूक्ष्म बोगदा तज्ञ ख्रिस कूपर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, व्हर्टिकल ड्रिलिंगचे कामे थांबविण्यात आली आहेत. दरम्यान ४१ कामगारांच्या बचावासाठी आम्ही बोगद्यातच मॅन्युअल ड्रिलिंगवर लक्ष केंद्रित करत आहेत. जे वेगाने प्रगती करत आहे. ते पुढे म्हणाले की, आज (दि.) सायंकाळी ५ वाजेपर्यंत आम्हाला ठोस निकाल मिळण्याची आशा आहे, असेही ते म्हणाले.
Uttarkashi tunnel rescue: अनेक नेते, अधिकारी बोगदा दुर्घटनास्थळी
बोगदा दुर्घटनेस्थळी बचाव कार्यातील महत्त्वाचा टप्पा पार झाल्याने, अनेक नेते आणि अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्री जनरल व्हीके सिंग (निवृत्त), PMOचे माजी सल्लागार भास्कर खुल्बे आणि माजी अभियंता-इन-चीफ आणि बीआरओ डीजी लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग (निवृत्त) सिल्कियारा बोगद्यातून बाहेर आल्याचे व्हिडिओ शेअर करून या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.

#WATCH | Uttarkashi tunnel rescue | Union Minister General VK Singh (Retd), former advisor of PMO Bhaskar Khulbe and former Engineer-In-Chief and BRO DG Lieutenant General Harpal Singh (Retd) come out of the Silkyara tunnel.
Uttarakhand CM Pushkar Singh Dhami tweeted that the… pic.twitter.com/PonzSJanwK
— ANI (@ANI) November 28, 2023

रुग्णवाहिका आणि सामुहिक आरोग्य रूग्णालयं सज्ज
बचाव कार्यादरम्यान राज्य आणि केंद्र सरकारच्या एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि इतर अनेक एजन्सी घटनास्थळी आहेत.  दरम्यान अनेक रुग्णवाहिका सिल्क्यारा बोगद्यात पाठवण्यात आल्या आहेत. तसेच कामगारांच्या आरोग्यासाठी चिन्यालीसौर येथे ४१ बेडचे सामायिक आरोग्य रूग्णालये सज्ज ठेवण्यात आले आहे. असे व्हिडिओ देखील एएनआयने माहिती देताना शेअर केले आहेत.

#WATCH | Uttarkashi (Uttarakhand) tunnel rescue | Several ambulances enter the Silkyara tunnel. NDRF, SDRF and several other agencies continue to be at the spot. pic.twitter.com/qwbZIjFjcj
— ANI (@ANI) November 28, 2023

हेही वाचा:

Uttarkashi tunnel rescue : बोगद्यातील मॅन्युअल ड्रिलिंगचा पहिला व्हिडिओ समोर; ५० मीटर उभे खोदकाम पूर्ण
Uttarkashi Tunnel : ३६ मीटरपर्यंत व्हर्टिकल ड्रिलिंग; १०० तासांत सुटका होण्याची शक्यता
Uttarkashi Tunnel Rescue | ऑगर मशीनचे तुटलेले ब्लेड बाहेर काढले, आता बचावकार्यात लष्कराची मदत

 
The post मोठी बातमी! बोगद्यातील ४१ कामगार कोणत्याही क्षणी बाहेर appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तराखंड उत्तरकाशीतील सिल्क्यारा बोगद्यात गेल्या १७ दिवसांपासून ४१ कामगार अडकले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी राज्य आणि केंद्रातील सर्व यंत्रणांनी युद्धपातळीवर बचावकार्य केले. दरम्यान उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी बोगद्यात अडकलेल्या कामगारांबाबत मोठी अपडेट दिली आहे. बोगद्यात खोदकामासह पाईप टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, बोगद्यातील ४१  कामगार कोणत्याही क्षणी बाहेर येतील, हा …

The post मोठी बातमी! बोगद्यातील ४१ कामगार कोणत्याही क्षणी बाहेर appeared first on पुढारी.

Go to Source