भगव्या ध्वजाला फडकं म्हणणं ठाकरेंचा नतदृष्टेपणा- बावनकुळे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून भगव्याचा अवमान केला जात आहे. कधी काळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या भगव्या झेंड्याखाली शिवसेना उभारली ते आज उद्धव ठाकरेंना फडकं वाटत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. Maharashtra Politics काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे? सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून …

भगव्या ध्वजाला फडकं म्हणणं ठाकरेंचा नतदृष्टेपणा- बावनकुळे

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून भगव्याचा अवमान केला जात आहे. कधी काळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या भगव्या झेंड्याखाली शिवसेना उभारली ते आज उद्धव ठाकरेंना फडकं वाटत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. Maharashtra Politics
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून भगव्याचा अवमान.
आज बाळासाहेब ठाकरे असते तर भगव्या ध्वजाचा असा अपमान त्यांनी कधीच सहन केला नसता.
सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी उद्धव ठाकरे भगव्याचा अवमान करत आहेत.

फडकं म्हणण्याचा नतदृष्टेपणा
परम पवित्र भगवा ध्वज करोडो हिंदुंची अस्मिता आणि स्वाभिमान आहे. त्याला फडकं म्हणण्याचा नतदृष्टेपणा उद्धव ठाकरेंनी केला. हाच भगवा झेंडा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ह्याच झेंड्याखाली शिवसेना उभारली पण उद्धव ठाकरेंना ते फडकं वाटतंय. आज बाळासाहेब ठाकरे असते तर भगव्या ध्वजाचा असा अपमान त्यांनी कधीच सहन केला नसता, पण दुर्दैवानं सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी उद्धव ठाकरे भगव्याचा अवमान करत आहेत. भगव्या ध्वजाला फडकं म्हणून तुम्ही कितीही शिव्याशाप दिल्या तरी हाच भगवा सदैव आमचं रक्षण करणार आहे. जय महाराष्ट्र!, असेही त्यांनी म्हटले आहे. Maharashtra Politics
बावनकुळे यांनी दिला अटल बिहारी वाजपेयींच्या कवितेचा दाखला…
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या कवितेचा दाखला देत उद्धव ठाकरेंना बावनकुळे यांनी सुनावले आहे.
कभी थे अकेले हुए आज इतने
नही तब डरे तो भला अब डरेंगे
विरोधों के सागर में चट्टान है हम
जो टकराएंगे मौत अपनी मरेंगे
लिया हाथ में ध्वज कभी न झुकेगा
कदम बढ रहा है कभी न रुकेगा
न सूरज के सम्मुख अंधेरा टिकेगा
निडर है सभी हम अमर है सभी हम
के सर पर हमारे वरदहस्त करता
गगन में लहरता है भगवा हमारा॥
हेही वाचा 

Raj Thackeray : चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट; ठाकरे गटाची मते वळविण्याची रणनिती
शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही तर खंजीराला महत्व : चंद्रशेखर बावनकुळे
‘उद्धव ठाकरे पिसाळलेत, त्यांना मनोरुग्णालयात दाखल करण्याची गरज’ : चंद्रशेखर बावनकुळे
लातूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंच्या वाहनांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे