Cannes मध्ये आज स्मिता पाटील यांचा चित्रपट मंथनचे स्क्रिनिंग

पुढारी ऑनलाईन डेस्क : चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांचा ‘मंथन’ चित्रपट १९७६ मध्ये रिलीज झाला होता. आता हा चित्रपट प्रतिष्ठित कान फिल्म फेस्टिवल २०२४ मध्ये प्रदर्शित केला जाईल. या चित्रपटामध्ये दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील मुख्य भूमिकेत होत्या. Cannes मध्ये ‘मंथन’चे आज स्क्रिनिंग मंथन हा चित्रपट १९७६ मध्ये प्रदर्शित झाला होता श्याम बेनेगल यांनी या चित्रपटाचे …

Cannes मध्ये आज स्मिता पाटील यांचा चित्रपट मंथनचे स्क्रिनिंग

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांचा ‘मंथन’ चित्रपट १९७६ मध्ये रिलीज झाला होता. आता हा चित्रपट प्रतिष्ठित कान फिल्म फेस्टिवल २०२४ मध्ये प्रदर्शित केला जाईल. या चित्रपटामध्ये दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील मुख्य भूमिकेत होत्या.
Cannes मध्ये ‘मंथन’चे आज स्क्रिनिंग

मंथन हा चित्रपट १९७६ मध्ये प्रदर्शित झाला होता
श्याम बेनेगल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते
मुख्य भूमिकेत स्मिता पाटील होत्या
आज प्रसिद्ध कान चित्रपट महोत्सवात प्रदर्शित केला जाईल
या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी दोन राष्ट्रीय पुरस्कार जिंकले होते

काय म्हणाले होते अमिताभ बच्चन?
महानायक अमिताभ बच्चन यांनी स्वत: आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही माहिती शेअर करत आनंद व्यक्त केला होता. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये ‘मंथन’चे पोस्टर शेअर केले होते. यामध्ये दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील दिसत होत्या.
अमिताभ बच्चन यांनी नोटमध्ये काय लिहिलं?
‘मंथन’ च्या पोस्टरसोबत बिग बींनी एक लांबलचक नोट लिहिली होती. त्यांनी लिहिलं होतं, ‘खूप अभिमान आहे की, चित्रपट विश्व प्रीमियर सोबत फिल्म फेस्टिवलमध्ये होईल…’
पाच लाख शेतकऱ्यांचे योगदान
स्मिता पाटील यांचा ‘मंथन’ चित्रपट भारताच्या कृषी परिदृश्यात क्रांतिकारी युगाची कहाणी दर्शवतो. ‘मंथन’ भारताचा पहिला क्राउडफंडेड चित्रपटांपैकी एक असल्याने त्याचे खूप कौतुक झाले होते. ज्यामध्ये पाच लाख शेतकऱ्यांनी चित्रपटाच्या निर्मिती सहाय्यतेसाठी दोन-दोन रुपयांचे योगदान दिले होते. त्याकाळी चित्रपट समीक्षकांकडून चित्रपटाला सकारात्मक प्रतिक्रिया मिळाली होती. १९७७ मध्ये हिंदीमध्ये सर्वोत्कृष्ट फिचर चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकले होते. १९७६ च्या अकादमी पुरस्कारांमध्येही भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.
हेदेखील वाचा-

‘भेदभाव का?’ ‘हिरामंडी’साठी मिळालेल्या मानधनावर सोनाक्षी जरा स्पष्टच बोलली
Cannes 2024 च्या रेड कार्पेटवर Urvashi Rautela ने दीपिका पदुकोणला केलं कॉपी
हाताला फ्रॅक्चर तरीही कान्समध्ये पोहोचली ऐश्वर्या राय, नजरा खिळल्या तिच्यावरच!