Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता शत्रुघ्न सिन्हाची मुलगी आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ‘हिरामंडी’ वेबसीरीजमुळे खूपच चर्चेत आली आहे. या वेबसीरीजमध्ये सोनाक्षीने ‘फरिदन’ हिची दमदार भूमिका साकारली आहे. ही भूमिका सुरूवातीला निगेटिव्ह असते, मात्र, शेवटी त्याचे पॉझिटिव्ह भूमिकेत रूपातंर होते. ही वेबसीरीज रिलीज झाल्यानंतर सोनाक्षीच्या अभिनयाचे भरभरून कौतुक केलं गेलं. याच दरम्यान सोनाक्षीने एका मुलाखतीत ‘हिरामंडी’ साठी मिळालेल्या मानधनावरील भेदभाव आपलं मत प्रकट केलं आहे.
सोनाक्षी सिन्हाबद्दल ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?
सोनाक्षी सिन्हा ‘हिरामंडी’ वेबसारीजमुळे चर्चेत आली आहे.
सोनाक्षीने ‘हिरामंडी’च्या मानधनावरील भेदभावावर स्पष्टच बोलली.
सोनाक्षीने सलमान खानच्या ‘दंबग’ चिपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
सोनाक्षीने ‘राऊडी राठोर’ या चित्रपटात ‘पारो’ ची मुख्य भूमिका साकारली.
सोनाक्षीचा मानधनासाठी संघर्ष
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने सांगितले की, ”सध्या मी माझ्या करिअरमध्ये एका चांगल्या उंचीवर पोहोचले आहे. मला करिअरमध्ये ज्या चांगल्या भूमिका साकारायच्या होत्या, त्या मी प्रभावीपणे साकारल्या. करिअरमध्ये इतरांपेक्षा अनेक वेगळ्या आणि दमदार भूमिका साकारून त्या एन्जॉय केल्या आहेत. मात्र, करिअर चांगले असूनही पैसाची तंगी जाणवत आहे. पैसासाठी या इडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्रींना झगडावे लागते. भूमिका चांगली मिळूनही त्याच्याप्रमाणे काही वेळा मानधन चांगले मिळत नाहीत. कधीकधी ही गोष्ट मनाला योग्य वाटत नाही. परंतु, जेव्हा चित्रपट निर्माते तुमच्याशी संपर्क साधतात तेव्हा त्यांना माहित असते की, तुम्ही नक्कीच काहीतरी या भूमिकेसाठी समझोता कराल. दरम्यान जेव्हा पैशाचा प्रश्न येतो तेव्हा प्रत्येकाला अभिनेत्रींनी फी कमी करावी असे वाटत असते.”
सोनाक्षी यापुढे म्हणाली की, कमी पैशाच्या बाबतीत फक्त अभिनेत्रींसोबतच का भेदभाव केला जातो?, हे तिला समजत नाही. आता ही लढाई एक स्त्री म्हणून लढायची आहे. एक स्त्री आहे म्हणून असा भेदभाव होत असे असेल तर मग अभिनेत्रींनी ही लढाई लढायला हवी आणि आपल्या हक्काचे पैसे वसूल करावे. यासाठी सारखे-सारखे संघर्ष करत राहण्यापेक्षा कोणी तरी पुढे यावे आणि समान दर्जाचा विचार करावा. यासोबत सोनाक्षीने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी केलेल्या कौतुकाबद्दलही माहिती दिली.
सोनाक्षीला साकारायची होती ‘बिब्बो जान’
सोनाक्षीला या मुलाखतीत विचारण्यात आलं की, ‘हिरामंडी’मध्ये तुला दुसरी भूमिका करण्याची संधी मिळाली असती तू कोणाची भूमिका निवडली असतील. या प्रश्नाच्या उत्तारवर सोनाक्षी म्हणाली की, मला या बेवसीरीजमधील ‘बिब्बो जान’ची भूमिका साकारायची होती. बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने ‘हिरामंडी’मध्ये ‘बिब्बो जान’ची भूमिका साकारली आहे.
हेही वाचा
हाताला फ्रॅक्चर तरीही कान्समध्ये पोहोचली ऐश्वर्या राय, नजरा खिळल्या तिच्यावरच!
Abha Ranta : ‘हिरामंडी’ च्या नव्या अभिनेत्रीची चर्चा; ‘लापता लेडीज’ फेम आभा रांटा आहे तरी कोण?
Sanjeeda Sheikh : अचानक घटस्फोट; सिंगल मदर बनून मुलीचं संगोपन, ‘हिरामंडी’ ची’ही’ अभिनेत्री चर्चेत
View this post on Instagram
A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)
View this post on Instagram
A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)