घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा तपास मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेकडे

पुढारी ऑनलाईन डेस्क:  घाटकोपर होर्डिंग घटनेचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. तत्पूर्वी होर्डिंग  मालक भावेश भिंडे याला उदयपूर येथून काल रात्री अटक (Ghatkopar hoarding collapse) करण्यात आली. त्यानंतर त्याला काल रात्रीच मुंबईत आणण्यात आले असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेने दिली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. घाटकोपरमध्ये मोठमोठे होर्डिंग लावणाऱ्या कंपनीचा …

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा तपास मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेकडे

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क:  घाटकोपर होर्डिंग घटनेचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. तत्पूर्वी होर्डिंग  मालक भावेश भिंडे याला उदयपूर येथून काल रात्री अटक (Ghatkopar hoarding collapse) करण्यात आली. त्यानंतर त्याला काल रात्रीच मुंबईत आणण्यात आले असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेने दिली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.
घाटकोपरमध्ये मोठमोठे होर्डिंग लावणाऱ्या कंपनीचा संचालक भावेश भिंडे (Ghatkopar hoarding collapse) याला मुंबई पोलिसांनी काल (दि. १६) ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला काल रात्रीच मुंबईत आणण्यात आले असून, लवकरच त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

Ghatkopar hoarding collapse incident | Investigation of the incident handed over to Mumbai Police Crime Branch. Owner Bhavesh Bhinde was arrested from Udaipur and brought to Mumbai yesterday: Mumbai Crime Branch
— ANI (@ANI) May 17, 2024

Ghatkopar hoarding collapse: काय आहे घाटकोपर होर्डिंग दुर्घटना?
मुंबई ठाणे परिसरात सोमवारी (दि.१३) वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यादरम्यान  घाटकोपरमध्ये वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पेट्रोल पंपावर भलेमोठे होर्डिंग कोसळले. या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला तर ७५ जण जखमी झाले. इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड ही जाहिरात एजन्सी या परिसरात होर्डिंग्ज लावण्यासाठी जबाबदार होती. या कंपनीचा भावेश भिडे हा संचालक असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याला काल (दि.१६) अटक करण्यात आली.
हेही वाचा:

Ghatkopar hoarding collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना हे रेल्वेचेच पाप! वर्षाकाठी जीआरपी घेत होती ६ लाखांचे भाडे
Ghatkopar Hoarding Collapse | १४ लोकांच्या मृत्यूस कारणीभूत भावेश भिंडेवर बलात्कारासह 26 गुन्हे; जाणून घ्या ‘कारनामे’
Mumbai Hoarding Collapse | घाटकोपर होर्डिंग दुर्घटना : मृतांची संख्या १४ वर; ४३ जणांवर उपचार