Weather Update : शहराच्या काही भागांत अवकाळीची हजेरी; तापमानात घट
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : पुणे शहरासह पिंपरी आणि जिल्ह्याच्या काही भागांत गुरुवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. हडपसर, मगरपट्टा, चिंचवड, वडगाव शेरी, शिवाजीनगर या भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली. दरम्यान, या पावसामुळे कमाल तापमानात घट झाली आहे. या अवकाळी पावसामुळे कोरेगाव पार्क, धानोरी तसेच हडपसर भागात झाडांच्या फांद्या तुटल्याच्या काही घटना घडल्या. अशी माहिती अग्निशामक दलाने दिली.
पुणे शहर आणि परिसरात मागील दोन ते तीन दिवसांपासून दुपारनंतर अवकाळी पाऊस वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. दरम्यान, दुपारनंतर हडपसर, मगरपट्टा. कोरेगाव पार्क, वडगाव शेरी या भागांसह शिवाजीनगर या भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली. दरम्यान, वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (दि.17) देखील शहराच्या काही भागात अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे.
हेही वाचा
पिचाई आणि नाडेलांमध्ये जुंपली!
‘आदित्य एल-1’ने टिपली सौर वादळाची छायाचित्रे
जपानने बनवले जगातील पहिले 6 जी डिव्हाईस