धुळे लोकसभेत अत्यावश्यक सेवेतील 895 मतदारांनी केले मतदान

धुळे पुढारी वृत्तसेवा- धुळे लोकसभा मतदारसंघासाठी 20 मे, 2024 रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातील तळमजला लगतची याठिकाणी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत 895 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. अशी माहिती उपजिल्हाधिकारी (प्रशासन) तथा नोडल …

धुळे लोकसभेत अत्यावश्यक सेवेतील 895 मतदारांनी केले मतदान

धुळे Bharat Live News Media वृत्तसेवा- धुळे लोकसभा मतदारसंघासाठी 20 मे, 2024 रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातील तळमजला लगतची याठिकाणी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत 895 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. अशी माहिती उपजिल्हाधिकारी (प्रशासन) तथा नोडल अधिकारी संदीप पाटील यांनी दिली आहे.

धुळे लोकसभा मतदार संघ निवडणूकीसाठी मतदानाच्या दिवशी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क टपाली मतपत्रिकेद्वारे बजावता यावा, यासाठी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय येथे दिनांक 14 ते 16 मे या कालावधीत सकाळी 9 ते सांयकाळी 5 वाजेपर्यंत टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. धुळे लोकसभा मतदार संघात एकूण 1099 अत्यावश्यक सेवेत कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठी नोंदणी केली होती. त्यानुसार गेल्या तीन दिवसात 895 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यात धुळे लोकसभा मतदार संघातील 881 तर इतर मतदार संघातील 14 मतदारांचा समावेश असल्याचे  पाटील यांनी कळविले आहे.