व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नोंदणी आवश्यक; नोंदणी प्रक्रिया सुरू

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटीसेलने व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विविध अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा घेऊन त्यांचे निकाल जाहीर केले आहेत. त्यापैकी आठ अभ्यासक्रमांसाठी महाविद्यालयांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, येत्या 27 मेपर्यंत नावनोंदणी करावी लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शासनाने विधी 5 वर्ष, विधी 3 वर्ष, बी.एड., एम.एड., बी.पी.एड., …

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नोंदणी आवश्यक; नोंदणी प्रक्रिया सुरू

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटीसेलने व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विविध अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा घेऊन त्यांचे निकाल जाहीर केले आहेत. त्यापैकी आठ अभ्यासक्रमांसाठी महाविद्यालयांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, येत्या 27 मेपर्यंत नावनोंदणी करावी लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शासनाने विधी 5 वर्ष, विधी 3 वर्ष, बी.एड., एम.एड., बी.पी.एड., एम.पी.एड., बी.ए./बी.एस्सी. बी.एड. आणि बी.एड., एम.एड. हे अभ्यासक्रम व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून अधिसूचित केले असून, संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची नियमावली प्रसिद्ध केली आहे. त्यानुषंगाने संबंधित अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटीसेलच्या वतीने घेण्यात येत आहेत.
सद्यःस्थितीत शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षेची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली आहे. त्यानुषंगाने शैक्षणिक वर्ष 2024- 25 मधील केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ इच्छिणार्‍या संबंधित अभ्यासक्रमाच्या शासकीय, अशासकीय अनुदानित अशासकीय अनुदानित अल्पसंख्याक विद्यापीठ संचलित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित अल्पसंख्याक कायम विनाअनुदानित तत्त्वावर सुरू असणारी महाविद्यालये, विद्यापीठ विभाग यांनी 15 ते 27 मे दरम्यान ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी, असे सीईटीसेलच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
नावनोंदणीबाबत सूचना

अर्जामध्ये अचूक माहिती भरून सर्व कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
अर्जातील सर्व माहिती बिनचूकपणे भरण्यात येईल, याबाबत दक्षता घेण्यात यावी.
माहिती भरून आवश्यक कागदपत्र अपलोड केल्यानंतर कागदपत्रांची फेरपडताळणी करून खातरजमा करावी.
अर्ज सबमिट झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून त्यावर प्राचार्यांनी स्वाक्षरी करावी. तसेच अपलोड केलेल्या सर्व कागदपत्रांच्या सुस्पष्ट
छायांकित प्रति संचालनालयाकडे 31 मे रोजी दुपारी 2.00 पर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने पाठवाव्यात.
आवश्यक कागदपत्रे अपलोड केलेली नसल्यास किंवा सादर न केल्यास, संबंधित महाविद्यालयाचे नाव प्रवेश प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यात येणार नाही, याची नोंद घेण्यात यावी.

हेही वाचा

लाचखोर पोलिस निरीक्षकाच्या घरात तीन कोटींचे घबाड
कोल्हापूर जिल्ह्यात 5 लाख 76 हजार जणांना ‘हाय बीपी’
नरेंद्र मोदी यांच्यासारखाच पंतप्रधान पाकिस्तानला हवा