देहू गायरान जमीनप्रश्नाबाबत आजपासून उपोषण
देहूगाव : पुढारी वृत्तसेवा : देहूगाव गायरान जमिनीबाबत देहूच्या ग्रामस्थांनी मंगळवार (दि. 28) पासून उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस आयुक्त पिंपरी-चिंचवड, तसेच देहूरोड पोलिस ठाण्यात लेखी निवेदन दिले आहे; परंतु शासनाने या निवेदनाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे देहूच्या ग्रामस्थांनी उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला; परंतु कार्तिकी यात्रा काही दिवसांवर आल्याने याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वतीने उपोषण कर्त्यांच्या उपस्थितीत, देहू देवस्थान संस्थानमध्ये सोमवारी बैठक घेण्यात आली.
कार्तिकी यात्रा जवळ आली आहे. या यात्रेत पोलिस यंत्रणेवर मोठा ताण येतो. त्यामुळे यात्रा काळात उपोषण करू नये. येत्या चार-पाच दिवसांत तुमचे म्हणणे शासनाला कळवितो, असे देहूरोड ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे यांनी उपोषणकर्त्यांपुढे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे म्हणणे मांडले. देहूगाव गायरानाची जमीन ही अद्यापही संरक्षण विभागाच्या ताब्यात आहे. ती अद्यापही शासनाच्या ताब्यात नाही. त्यामुळे ही जमीन इतर कोणाच्याही ताब्यात देण्याचा निर्णय शासन घेऊ शकत नाही, अशी माहिती पिंपरी-चिंचवडच्या अप्पर तहसीलदार अर्चना निकम यांनी दिल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे यांनी या बैठकीत सांगितले.
या प्रश्नासंदर्भात खासदार, आमदार, जिल्हाधिकारी; तसेच इतर संबंधित कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे; परंतु त्या पत्रांची दखल कोणीच घेतली नाही. त्यामुळे आता हे उपोषण ठरलेल्या दिवशी सुरू करण्यात येणार असल्याची भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली. परिणामी मंगळवारपासून (दि.28) उपोषण सुरु होणार असल्याचे चित्र आहे. बैठकीस उपोषणकर्ते, देहू देवस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, नगराध्यक्षा पूजा दिवटे, नगरसेवक योगेश परंडवाल, योगेश काळोखे, प्रवीण काळोखे, प्रकाश काळोखे, प्रशांत काळोखे, बाळासाहेब काळोखे, गणेश मोरे आदी उपस्थित होते.
हेही वाचा
Pune : अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली
अमरावती : डोक्यावर प्रहार करून सराफ व्यावसायिकाची हत्या; तिवसा येथील घटना
Baramati : रेड बर्ड वैमानिक प्रशिक्षण संस्थेच्या नऊ जणांवर गुन्हा
The post देहू गायरान जमीनप्रश्नाबाबत आजपासून उपोषण appeared first on पुढारी.
देहूगाव : पुढारी वृत्तसेवा : देहूगाव गायरान जमिनीबाबत देहूच्या ग्रामस्थांनी मंगळवार (दि. 28) पासून उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस आयुक्त पिंपरी-चिंचवड, तसेच देहूरोड पोलिस ठाण्यात लेखी निवेदन दिले आहे; परंतु शासनाने या निवेदनाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे देहूच्या ग्रामस्थांनी उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला; परंतु कार्तिकी यात्रा …
The post देहू गायरान जमीनप्रश्नाबाबत आजपासून उपोषण appeared first on पुढारी.