शुभम सिदनाळे याने अटीतटीच्या लढतीत गुणांवर मारले कुस्ती मैदान
सरवडे: Bharat Live News Media वृत्तसेवा ; सरवडे ( ता. राधानगरी ) येथील राधानगरी, भुदरगडचे भाग्यविधाते, काळम्मावाडी धरणाचे प्रणेते आमदार कै. किसनराव मोरे यांच्या ४९ व्या पुण्यतिथीनिमित्त किसनराव मोरे शिक्षण संकुलाच्या पटांगणामध्ये कुस्त्या घेण्यात आल्या. या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या लढतीत शिवराम दादा तालीम पुणेच्या शुभम सिदनाळे याने उपहिंद केसरी काका पवार तालीम पुणेच्या तुषार डुबे यांच्यावर गुणांवर मात करत प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.
द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीत सुदेश ठाकूर (सांगली) विरुद्ध प्रशांत शिंदे ( सांगली) यांची बरोबरीत कुस्ती निकालात काढली. तसेच पुन्हा दुसऱ्या क्रमांकाची उदयराज पाटील (अर्जुनवाडा) यांनी सचिन ठोंबरे ( सांगली) यांना गुणांवर चितपट केले. तर तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत रोहन रंडे (मुरगुड) याने गुणांवर प्रदिप ठाकूर (सांगली)याच्यावर मात केली.
पुन्हा तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत शशिकांत बोंगार्डे (बिद्री मानधनधारक ) याने एकेरी पट काढून अजित पाटील (शाहूवाडी ) यावर विजय मिळवला. तर चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत अक्षय चौगले (अर्जुनवाडा ) याने लाटणे डावावर स्वप्नील काशिद ( पुणे) याला चितपट केले. एकमेव झालेल्या महिला लढतीत कु. सिध्दी तानाजी सावंत ( नरतवडे) हिने कु. मधुरा खंदारे (सुरुपली ) हिच्यावर लपेट डावाने मात केली. याशिवाय कुस्ती मैदानात लहानमोठ्या पन्नासहून अधिक रोमहर्षक कुस्त्या झाल्या.
इतर विजयी मल्ल
ऋषिकेश पाटील ( बानगे), श्रेयस गाठ (राशिवडे ) व साहिल मांगोरे ( बानगे) कुस्ती बरोबरीत, प्रुथ्वीराज जाधव (गोरंबे ), स्वप्नील शेंडे (तिटवे ), सुदेश नरके (आनूर), ओमकार पाटील ( राशिवडे), गुरु जोंधळेकर (शाहुपुरी ), सनी अस्वले (राशिवडे ), अंकुश खतकर ( भडगांव), समीर पाटील ( म्हाकवे), राज जाधव ( सोळांकूर), म्रुणाल पाटील (राशिवडे )विरुद्ध ज्ञानेश्वर शिंदे (मुरगुड ) व विपीन सावंत (सरवडे)विरुद्ध आयुष जिरगे ( गंगापूर) या दोन्हीही कुस्त्या बरोबरीत, दुर्वेश नार्वेकर (तिटवे ), आदित्य गिरीगोसावी (सरवडे ), सौरभ बोंगार्डे (बानगे ), विघ्नेश पाटील ( अर्जुनवाडा), प्रज्वल पाटील ( अर्जुनवाडा), सत्यजित संकपाळ ( गंगापूर), ऋतुराज कवडे ( बानगे), प्रथमेश बोंगार्डे(गंगापूर ), सौरभ पाटील (उंदरवाडी ), हर्षद जाधव (सरवडे ),
निल भारमल (भडगांव ), आदित्य फराकटे (आटेगाव ), विरेन खराडे(तुरंबे ), समर्थ खंदारे(बानगे ), वेदांत निगुरे(बानगे ), अथर्व संकपाळ(पाचवडे ), सार्थक ताटे (बानगे ), हर्षवर्धन एकशिंगे ( केनवडे), ओंकार वाडकर ( कोनवडे), अभिजित तांदळकर( राशिवडे), समरजीत पाटील( अर्जुनवाडा), नवनाथ मगदूम(मडिलगे ), अर्णव डकरे(राशिवडे ), अथर्व पाटील(निगवे ), हर्षवर्धन बोंगार्डे(तळाशी ), वर्धन घारे( तिटवे), अजय ढगे( राशिवडे), कौतुक शिंदे (मुरगुड ), युवराज सुतार ( राशिवडे), तनिष्क कुराडे(नंदगाव ), जीवन मगदूम ( मुरगुड), ओम कदम (निळपण ) यासह अनेक नेमलेल्या कुस्त्या पार पडल्या.
संपूर्ण कुस्तीचे निवेदन कृष्णात चौगले राशिवडे यांनी केले. तर पंच म्हणून विक्रमसिंह मोरे, उपमहाराष्ट्र विजेते श्रीधर रेपे, नामदेव चौगले आदिंसह नामवंत पैलवानांनी काम पाहिले. यावेळी विजयी मल्लांना शिल्ड, रोख रक्कम, प्रमाणपत्र आमदार कै. किसनराव मोरे चँरिटेबल ट्रस्ट सरवडे व विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
गोकुळचे संचालक आर. के. मोरे, डी. के. मोरे, जे. के. मोरे, सरपंच रणधीर मोरे, विक्रम मोरे, गोकूळचे संचालक विश्वास पाटील, किसन चौगले, बिद्रीचे संचालक डी. एस. पाटील, दामोदर वागवेकर, शिक्षक नेते नामदेवराव रेपे, विलास पाटील, राजेंद्र यादव, उपमहाराष्ट्र केसरी नंदू आबदार, राजेंद्र पाटील, जयवंतराव पाडळकर, शंकरराव फराकटे, शिवाजी आदमापुरे, संजय कांबळे, हेमंत कोतमिरे, एस. पी. पाटील, वसंत पाटील आदिंसह कुस्तीप्रेमी, पदाधिकारी, मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा
जनतेच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : युगेंद्र पवार
Lok Sabha Election 2024 | ना महायुती, ना मविआ; ‘स्वराज्य’चा नारा विधानसभा
गर्भवतींना पोस्टल बॅलेटद्वारे मतदान परवानगीबाबत विचार करा : उच्च न्यायालय