प्रभाकर धुरी
पणजी: सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार मिळणे हा आपला खूप मोठा सन्मान आहे, असे भावोद्गार ग्लोबल लिजेंड तथा हॉलीवूड अभिनेते मायकेल डग्लस यांनी पत्रकार परिषदेत काढले. चित्रपट समान भाषा बोलतात आणि आपल्याला अधिक जवळ आणतात, असेही त्यांनी सांगितले. IFFI Goa 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारत गेल्या काही वर्षांत चित्रपट निर्मितीमध्ये अधिक गुंतवणूक आहे, असे अभिनेते आणि चित्रपट निर्माता मायकेल डग्लस यांनी म्हटले. IFFI Goa 2023
54 व्या इफ्फी च्या समारोप समारंभात उद्या मायकेल डग्लस यांना प्रतिष्ठेच्या सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ते पुढे म्हणाले की, भारतीय चित्रपट उद्योगासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. इफ्फी 54 मध्ये 78 हून अधिक परदेशी देशांचे प्रतिनिधित्व हे भारताच्या सामर्थ्याचे प्रतिबिंब आहे. भारतीय चित्रपट जगभर प्रसिद्ध आहेत आणि जगाच्या कानाकोपऱ्यात ते पोहोचत आहेत. स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
मायकेल डग्लस म्हणाले की, हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळणे हा आपला मोठा सन्मान आहे. आपल्या महाविद्यालयीन दिवसांच्या आठवणींमध्ये रमताना त्यांनी सांगितले की त्यांनी सत्यजित रे यांच्या पथेर पांचाली आणि चारुलता सारख्या चित्रपटांचा त्यांच्या चित्रपट प्रशिक्षणा दरम्यान अभ्यास केला होता. त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे ही त्यांच्यासाठी विशेष गोष्ट आहे. रे यांचे चित्रपट खूप मनोरंजक होते आणि त्यांनी वास्तवाचे चित्रण केले. रे यांचे मोठेपण हे आहे की ते एकाच वेळी केवळ दिग्दर्शकच नव्हते. तर लेखक, चित्रपट संपादक, आणि संगीतकारही होते.
ऑस्करमध्ये भारतीय चित्रपट आरआरआर ने मिळवलेल्या यशाची प्रशंसा करताना मायकेल डग्लस म्हणाले की, भारतासाठी ही एक नेत्रदीपक कामगिरी आहे आणि यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि भारतीय चित्रपट उद्योगाला असे अनेक मोठे चित्रपट तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
मायकेल डग्लस यांची पत्नी आणि बहु-पुरस्कार विजेती अभिनेत्री कॅथरीन झेटा जोन्स यांनीही माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, भारत त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला खूप प्रिय आहे. भारताशी असलेला आपला संबंध स्पष्ट करत, त्यांनी एका भारतीय डॉक्टरचा उल्लेख केला, ज्याने त्या अठरा महिन्यांच्या असताना त्यांचे प्राण वाचवले होते. या बाफ्टा पुरस्कार विजेत्या अभिनेत्रीने भारतीय चित्रपटांबद्दलचे त्यांचे प्रेम देखील प्रकट केले आणि बॉलीवूड चित्रपटांचा भाग होण्याची इच्छा व्यक्त केली.
हेही वाचा
54th IFFI : इफ्फीचा आज समारोप; आयुष्मान खुराना, इशा गुप्ता उपस्थित राहणार
IFFI Goa 2023 : ‘द केरला स्टोरी’ चित्रपट मनाला समाधान देऊन गेला : दिग्दर्शक सुदीप्तो सेन
IFFI Goa 2023 …मग चांगल्या गोष्टी चित्रपटांमधून का घेत नाहीत ? : विद्या बालन यांचा सवाल
The post ‘सत्यजित रे’ जीवनगौरव पुरस्कार आपलासाठी मोठा सन्मान: मायकेल डग्लस appeared first on पुढारी.
पणजी: सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार मिळणे हा आपला खूप मोठा सन्मान आहे, असे भावोद्गार ग्लोबल लिजेंड तथा हॉलीवूड अभिनेते मायकेल डग्लस यांनी पत्रकार परिषदेत काढले. चित्रपट समान भाषा बोलतात आणि आपल्याला अधिक जवळ आणतात, असेही त्यांनी सांगितले. IFFI Goa 2023 पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारत गेल्या …
The post ‘सत्यजित रे’ जीवनगौरव पुरस्कार आपलासाठी मोठा सन्मान: मायकेल डग्लस appeared first on पुढारी.