आधी पत्नी आणि मुलाचा जीव घेतला, नंतर स्वत:लाही संपवलं
बार्शी; पुढारी वृत्तसेवा : बार्शी शहरातील उपळाई रोडवरील नाईकवाडी प्लॉट येथे धक्कादायक घटना घडली आहे. शिक्षक पतीने आपल्या शिक्षक पत्नीचा गळा चिरून व आपल्या ११ वर्षाच्या मुलाच्या तोंडावर उशी ठेवून हत्या केली. त्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन जीवन संपवले. ही घटना मंगळवारी (दि.२८) सकाळी उघडकीस आली.
अतुल सुमंत मुंढे (वय ३८), तृप्ती अतुल मुंढे (वय ३७), ओम सुमंत मुंढे (वय ११) अशी मृतांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली प्राथमिक माहिती अशी की, अतुल मुंढे हे करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. तर तृप्ती मुंढे या बार्शीतील अभिनव प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. दोघेही उपळाई रोडवरील आपल्या घरात वरच्या मजल्यावर राहत होते. खालच्या मजल्यावर अतुल मुंढे यांचे आई-वडील राहतात. वरच्या मजल्यावरील कोणीही खाली न आल्याने अतुल यांच्या आई-वडिलांनी मंगळवारी सकाळी वर जावून पाहिले असता ही घटना उघडकीस आली. त्यानंतर तात्काळ बार्शी पोलिसांना कळविण्यात आले. पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले असून अधिकचा तपास सुरू आहेत.
हेही वाचा :
Pune Crime News : महाळुंगे हत्येतील हल्लेखोरांची नावे निष्पन्न
Crime News : गावठी पिस्तुल बाळगणारा गजाआड; पिस्तुलासह ३ जिवंत काडतुसे जप्त
Pune Crime News : वैद्यकीय प्रवेशाच्या बहाण्याने 27 लाखांची फसवणूक
The post आधी पत्नी आणि मुलाचा जीव घेतला, नंतर स्वत:लाही संपवलं appeared first on पुढारी.
बार्शी; पुढारी वृत्तसेवा : बार्शी शहरातील उपळाई रोडवरील नाईकवाडी प्लॉट येथे धक्कादायक घटना घडली आहे. शिक्षक पतीने आपल्या शिक्षक पत्नीचा गळा चिरून व आपल्या ११ वर्षाच्या मुलाच्या तोंडावर उशी ठेवून हत्या केली. त्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन जीवन संपवले. ही घटना मंगळवारी (दि.२८) सकाळी उघडकीस आली. अतुल सुमंत मुंढे (वय ३८), तृप्ती अतुल मुंढे (वय ३७), …
The post आधी पत्नी आणि मुलाचा जीव घेतला, नंतर स्वत:लाही संपवलं appeared first on पुढारी.