डायनासोर दुसर्‍या ग्रहांवर अद्यापही अस्तित्वात?

वॉशिंग्टन : पृथ्वीला झालेल्या एका लघुग्रहाच्या धडकेनंतर 6 कोटी वर्षांपूर्वी डायनासोरसह प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या. मात्र, आजही त्यांचे अस्तित्व असू शकते असे काही संशोधकांना वाटते. अर्थात हे पृथ्वीवर नव्हे तर अन्य एखाद्या ग्रहावर! रॉयल अ‍ॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी जर्नलमध्ये याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की पृथ्वीपासून दूर अन्य ग्रहांवर डायनासोरसारख्या काही प्रजाती … The post डायनासोर दुसर्‍या ग्रहांवर अद्यापही अस्तित्वात? appeared first on पुढारी.
#image_title

डायनासोर दुसर्‍या ग्रहांवर अद्यापही अस्तित्वात?

वॉशिंग्टन : पृथ्वीला झालेल्या एका लघुग्रहाच्या धडकेनंतर 6 कोटी वर्षांपूर्वी डायनासोरसह प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या. मात्र, आजही त्यांचे अस्तित्व असू शकते असे काही संशोधकांना वाटते. अर्थात हे पृथ्वीवर नव्हे तर अन्य एखाद्या ग्रहावर! रॉयल अ‍ॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी जर्नलमध्ये याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की पृथ्वीपासून दूर अन्य ग्रहांवर डायनासोरसारख्या काही प्रजाती अस्तित्वात असण्याची शक्यता आहे. या संशोधनाच्या शोधनिबंधाच्या प्रमुख लेखिका लिसा कल्टेनेगर यांनी म्हटले आहे की राहण्यायोग्य ग्रहांबाबत समजून घेण्यासाठी आमची सध्याची समजूत ही पृथ्वीच्या विशिष्ट प्रकाश फिंगरप्रिंटने बरीच प्रभावित झाली आहे.
लिसा यांनी सांगितले, एक काळ असा होता ज्यावेळी प्रकाशाची ही फिंगरप्रिंट अधिक मजबूत होती. त्यावेळी जीवसृष्टीचा शोध घेणे अधिक सोपे होते. मात्र, सुदैवाने आज माणसाकडे असे तंत्रज्ञान आहे ज्याच्या सहाय्याने अन्य ग्रहांवरील जीवसृष्टीचा छडा लावला जाऊ शकतो. त्यामुळे माणूस अन्य ग्रहांवर ज्युरासिक वर्ल्डचाही छडा लावू शकतो. या प्राण्यांचा छडा लावण्यासाठी अन्य ग्रहांवर अशा घटकांचा शोध घ्यावा लागेल जे आज पृथ्वीवर आढळत नाहीत, मात्र डायनासोरच्या काळात ते अस्तित्वात होते.
संशोधनातून असे दिसून आले आहे की डायनासोरच्या काळात पृथ्वीवरील ऑक्सिजनच्या स्तरात वाढ झाली होती. ऑक्सिजनचा स्तर हा अन्य ग्रहांवर जटील जीवनाच्या अस्तित्वासाठी एक मौल्यवान संकेतकाच्या रूपात काम करू शकतो. डायनासोरच्या काळात पृथ्वीवर ऑक्सिजनचा स्तर सुमारे तीस टक्के अधिक होता. त्यामुळे गुंतागुंतीची रचना असलेल्या जीवांचा विकास होऊ शकला. सध्या ऑक्सिजनचा स्तर 21 टक्क्यांवर स्थिर आहे. अन्य ग्रहांवर डायनासोरसारख्या प्राण्यांचा शोध लावण्यासाठी प्रगत दुर्बिणींचाही वापर केला जाऊ शकतो.
The post डायनासोर दुसर्‍या ग्रहांवर अद्यापही अस्तित्वात? appeared first on पुढारी.

वॉशिंग्टन : पृथ्वीला झालेल्या एका लघुग्रहाच्या धडकेनंतर 6 कोटी वर्षांपूर्वी डायनासोरसह प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या. मात्र, आजही त्यांचे अस्तित्व असू शकते असे काही संशोधकांना वाटते. अर्थात हे पृथ्वीवर नव्हे तर अन्य एखाद्या ग्रहावर! रॉयल अ‍ॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी जर्नलमध्ये याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की पृथ्वीपासून दूर अन्य ग्रहांवर डायनासोरसारख्या काही प्रजाती …

The post डायनासोर दुसर्‍या ग्रहांवर अद्यापही अस्तित्वात? appeared first on पुढारी.

Go to Source