वाहन चालविण्यात तरुणी, महिलांचा वाढतोय टक्का
नाशिक : पुढारी वृत्तसेवा; प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) १ एप्रिल २०२२ ते १९ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत १ लाख ९१ हजार ०१८ चालकांनी वाहन चालवण्याचा परवाना घेतला आहे. त्यापैकी २३.६९ टक्के म्हणजेच ४५ हजार २५७ महिलांनी परवाना काढला आहे. तर ३२ ट्रान्सझेंडर व्यक्तींनीही परवाना घेतला आहे. (Nashik News)
वाहन चालवण्यासाठी नागरिकांना परवाना बंधनकारक आहे. त्यासाठी आरटीओकडे सुरुवातीस शिकाऊ परवाना काढावा लागतो. त्यानुसार एप्रिल २०२२ ते १९ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत २ लाख ३८२ जणांनी शिकाऊ परवाना घेतला होता. त्यात १ लाख ५८ हजार ४६२ पुरुष, ४१ हजार ६०२ महिला, ५३ ट्रान्सझेंडर असून २६५ चालकांचे लिंग समजू शकलेले नाही. तर याच कालावधीत १ लाख ४५ हजार ६५३ पुरुष, ४५ हजार २५७ महिला, ३२ ट्रान्सझेंडर व्यक्तींनी कायमस्वरुपी वाहन चालवण्याचा परवाना काढला आहे. तसेच ७६ जणांचे लिंग समजलेले नसून त्यांनीही कायमस्वरुपी परवाना घेतल्याचे आरटीओकडून स्पष्ट झाले आहे.
सिम्युलेटरचाही वापर
वाहन चालवण्याचा परवाना काढण्यासाठी चालकांना वाहन चालवण्याची परिक्षा द्यावी लागते. त्यासाठी आरटीओत असलेल्या मार्गावर वाहन चालवून चालकांची परिक्षा घेतली जाते. तसेच नव्याने सिम्युलेटर उभारण्यात आले असून त्यामार्फत १ हजार १५३ नागरिकांनी चाचणी दिली आहे.
विना परवानाधारकांवर कारवाई
परवाना नसताना वाहन चालवल्यास चालकांवर दंडात्मक कारवाई होत असते. तसेच वारंवार वाहतूक नियम मोडल्यास संबंधित चालकांचा वाहन परवाना निलंबित करण्याची तरतूद आहे. त्यामुळे बेशिस्त चालकांवर वचक ठेवण्यास मदत होते.
हेही वाचा :
Pune : नेरे केंद्रांतर्गत आढळल्या डेंग्यू, चिकुनगुनियाच्या अळ्या
Pune Drugs Case : ललित पाटील याला सहाय्य करणारा कर्मचारी अटकेत
Nashik News | जायकवाडीला पाणी : नांदुरमध्यमेश्वरच्या दोन गेटमधून विसर्ग
The post वाहन चालविण्यात तरुणी, महिलांचा वाढतोय टक्का appeared first on पुढारी.
नाशिक : पुढारी वृत्तसेवा; प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) १ एप्रिल २०२२ ते १९ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत १ लाख ९१ हजार ०१८ चालकांनी वाहन चालवण्याचा परवाना घेतला आहे. त्यापैकी २३.६९ टक्के म्हणजेच ४५ हजार २५७ महिलांनी परवाना काढला आहे. तर ३२ ट्रान्सझेंडर व्यक्तींनीही परवाना घेतला आहे. (Nashik News) वाहन चालवण्यासाठी नागरिकांना परवाना बंधनकारक आहे. त्यासाठी …
The post वाहन चालविण्यात तरुणी, महिलांचा वाढतोय टक्का appeared first on पुढारी.