चंद्रावरील खडकात आढळला हायड्रोजन
वॉशिंग्टन : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने 1960 व 1970 च्या दशकात चंद्रावर अनेक अपोलो मोहिमा आखल्या. यापैकी ‘अपोलो 17’ या मोहिमेत चंद्रावरून आणलेल्या खडकाचा अद्यापही अभ्यास केला जात आहे. आता या खडकात हायड्रोजनचे अस्तित्व असल्याचे आढळून आले आहे.
चंद्रावरून आणलेले खडक वर्षानुवर्षे संशोधकांच्या अभ्यासाचे विषय बनलेले आहेत. आता प्रथमच अशा खडकामध्ये हायड्रोजन असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे भविष्यातील मोहिमांमध्ये अंतराळवीर चंद्रावरच पिण्यासाठी तसेच रॉकेटच्या इंधनासाठी पाणी उपलब्ध करू शकतील, अशी आशा निर्माण झाली आहे. यूएस नेव्हल रिसर्च लॅबोरेटरीमधील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. या प्रयोगशाळेला ‘नासा’ने चंद्रावरील खडकांचे नमुने अभ्यासासाठी सोपवले होते.
आता यापैकी ‘79221’ या खडक नमुन्यात हायड्रोजन असल्याचे त्यांनी म्हटले आहे. चंद्रावर त्याचे अस्तित्व सौरवादळांचा तडाखा किंवा धूमकेतूची धडक यामुळे निर्माण झाले असावे, असे संशोधकांना वाटते. प्रमुख संशोधिका कॅथरीन बर्जेस यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की अशा खडकांचे चंद्रावरील स्थान शोधणे आणि ते गोळा करणे भविष्यातील मोहिमांसाठी उपयुक्त ठरू शकेल.
The post चंद्रावरील खडकात आढळला हायड्रोजन appeared first on पुढारी.
वॉशिंग्टन : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने 1960 व 1970 च्या दशकात चंद्रावर अनेक अपोलो मोहिमा आखल्या. यापैकी ‘अपोलो 17’ या मोहिमेत चंद्रावरून आणलेल्या खडकाचा अद्यापही अभ्यास केला जात आहे. आता या खडकात हायड्रोजनचे अस्तित्व असल्याचे आढळून आले आहे. चंद्रावरून आणलेले खडक वर्षानुवर्षे संशोधकांच्या अभ्यासाचे विषय बनलेले आहेत. आता प्रथमच अशा खडकामध्ये हायड्रोजन असल्याचे दिसून …
The post चंद्रावरील खडकात आढळला हायड्रोजन appeared first on पुढारी.