Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भाजप विरोधी ‘इंडिया’ आघाडीने विजय मिळवला, तर लोकसभा निवडणूक निकालाच्या दुसर्या दिवशी म्हणजे ५ जून रोजी मी तिहार कारागृहात बाहेर असेन, असा विश्वास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज ( दि. १३) व्यक्त केला. आम आदमी पाटींच्या नगरसेवकांच्या बैठकीत ते बोलत होते. दरम्यान, 25 मे रोजी दिल्लीतील सातही लोकसभेच्या जागांवर मतदान होणार आहे.
काय म्हणाले केजरीवाल ?
आपण आता परिश्रम घेतले आणि इंडिया आघाडीने निवडणूक जिंकेल
पण आता कठोर परिश्रम केले नाही तर आम्ही पुन्हा कधी भेटू शकतो हे मला माहित नाही,
मी २ जूनला तिहार तुरुंगात परतणार आहे.
४ जूनला तिहार तुरुंगात निवडणूक निकाल पाहणार आहे
तुरुंगात 13 अधिकाऱ्यांची माझ्यावर नजर
नगरसेवकांच्या बैठकीत बोलताना केजरीवाल म्हणाले की, तिहारमध्ये माझ्या सेलमध्ये दोन सीसीटीव्ही कॅमेरे होते. 13 अधिकाऱ्यांची माझ्यावर नजर होती. सीसीटीव्ही फीड पंतप्रधान कार्यालयासही देण्यात आल्याचे सांगण्यात आले. मला माहीत नाही. मोदींना माझ्याबद्दल काय राग आहे,” असे ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेने केजरीवालांच्या हवाल्याने म्हटले आहे.
मी २ जूनला तिहार तुरुंगात परतणार आहे. मात्र ४ जूनला तिहार तुरुंगात निवडणूक निकाल पाहणार आहे. जर आपण आता परिश्रम घेतले आणि इंडिया आघाडीने ही निवडणूक जिंकली तर मी ५ जून रोजी तुरुंगाच्या बाहेर येईन; परंतु आपण आता कठोर परिश्रम केले नाही तर आम्ही पुन्हा कधी भेटू शकतो हे मला माहित नाही,” असेही ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यांना 2 जून रोजी आत्मसमर्पण करायचे आहे.
‘तुम्ही ‘झाडू’ला निवडा, मला पुन्हा तुरुंगात जावे लागणार नाही
मी दोन जूनला पुन्हा एकदा कारागृहात जाणार आहे. ४ जूनला लोकसभा निवडणूक निकाला आहे. लोकसभा निवडणुकीत तुम्ही इंडिया आघाडीला निवडून दिले. आपच्या झाडू या चिन्हाला मतदान केले तर मला पुन्हा तुरुंगात जावे लागणार नाही, असा भाविनक साद दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवार, १२ मे रोजी मतदारांना घातली. केजरीवाल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासमवेत पक्षाचे नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सोमनाथ भारती यांच्या समर्थनार्थ मोती नगरमध्ये रोड शो केला. यानंतर त्यांनी मतदारांशी संवाद साधला.
तुमच्यासाठी काम केले म्हणून त्यांनी मला तुरुंगात पाठवले
यावेळी केजरीवाल म्हणाले की, ‘मी तुमच्यासाठी काम केले म्हणून त्यांनी मला तुरुंगात पाठवले. दिल्लीतील जनतेची कामे व्हावीत असे भाजपला वाटत नाही. तिहार तुरुंगात १५ दिवसांपासून इन्सुलिनची लस दिली गेली नाही. ‘मी पुन्हा तुरुंगात गेलो तर भारतीय जनता पक्ष मोफत वीज देणे बंद करेल, शाळा खराब करेल आणि रुग्णालये आणि मोहल्ला दवाखाने बंद करेल,’ असा दावाही त्यांनी केला.
हेही वाचा :
ब्रेकिंग : दिल्ली मुख्यमंत्रीपदी केजरीवालच राहणार, सुप्रीम काेर्टाने याचिका फेटाळली
Arvind Kejriwal: देशभरात 200 युनिट मोफत वीज : केजरीवालांनी जाहीर केल्या १० गॅरंटी
Arvind Kejriwal: केजरीवालांचे ‘मिशन’ लाेकसभा सुरु, ‘आप’ आमदारांची घेतली बैठक