पंचपिटिकेच्या तिसऱ्या पेटीत विरोचकाचे रहस्य?
पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत पंचपिटिका रहस्यामध्ये तिसरी पेटी सापडल्यावर आता पुढे काय होणार ह्याची सर्वानाच उत्सुकता आहे. पहिल्या आणि दुसऱ्या पेटीच रहस्य सर्वांसमोर उलघडले आहे, पण तिसरी पेटी कोणाच्या हाती लागणार आणि त्यातून काय रहस्य बाहेर येणार हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असेल.
तिसरी पेटी नेत्राची आहे का ती अव्दैतची असेल हे रहस्य ह्या आठवड्यात समोर येईल. पंचपिटिका रहस्य एक रोमांचक वळण घेईल जेव्हा तिसऱ्या पेटीमध्ये पानावर लिहिलेलं रहस्य वाचायला अवघड जाईल, कारण ते रहस्य सर्पलिपी मध्ये आहे. ह्या पेटीमध्ये विरोचक कोण आहे हे ही रहस्य उलगडू शकत. इंद्राणी कशी करेल नेत्राच रक्षण? काय होईल जेव्हा रुपाली समोर येईल विरोचकाच नाव? पानावरच्या रहस्यामध्ये असं काय लिहलं आहे जे वाचून नेत्रा आणि अद्वैतच्या पायाखालची जमीन हलणार आहे.
तिसऱ्या पेटीतून उलगडणाऱ्या रहस्यामुळे नेत्रा आणि अद्वैतच्या नात्यामध्ये बदल होणार का? पेटी मधल्या मजकुरावर लिहलेली सर्पलिपी वाचायला कोण करेल यांची मदत? तिसऱ्या पेटीमधून कोणतं रहस्य उलगडणार? की आणखी काही प्रश्न निर्माण होणार? हे रंजक ठरेल.
The post पंचपिटिकेच्या तिसऱ्या पेटीत विरोचकाचे रहस्य? appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत पंचपिटिका रहस्यामध्ये तिसरी पेटी सापडल्यावर आता पुढे काय होणार ह्याची सर्वानाच उत्सुकता आहे. पहिल्या आणि दुसऱ्या पेटीच रहस्य सर्वांसमोर उलघडले आहे, पण तिसरी पेटी कोणाच्या हाती लागणार आणि त्यातून काय रहस्य बाहेर येणार हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असेल. तिसरी पेटी नेत्राची आहे का ती अव्दैतची …
The post पंचपिटिकेच्या तिसऱ्या पेटीत विरोचकाचे रहस्य? appeared first on पुढारी.